Advertisement

कामगारांनी उर्मिला रोठे यांना बहुमताने विजयी करा..शेख यूनूस बुलढाण्यातील दोन हजार कामगारांचा उर्मिला रोठे यांना जाहीर पाठिंबा.

कामगारांनी उर्मिला रोठे यांना बहुमताने विजयी करा..शेख यूनूस 

बुलढाण्यातील  दोन हजार कामगारांचा उर्मिला रोठे यांना जाहीर पाठिंबा.


बुलढाणा 
महाराष्ट्रात सर्वप्रथम आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यात कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्याचा आदेश पारित घेतल्यामुळे असंख्य कामगारांना शासन प्रशासनाच्या योजनांचा आर्थिक लाभ मिळाला.
त्यामुळेच बुलढाणा नगर परिषद नगराध्यक्ष तथा नगरसेवकांसाठी सिलेंडर निशाणीवर बुलढाणा शहर विकास आघाडी तर्फे निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांन सन्मान स्वतंत्र  कामगार संघटनेच्या पदाधिकारी आणि दोन हजार कामगारांचा जाहीर पाठिंबा आज 23 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे.
फक्त जाहीर पाठिंबा करून थांबणार नाही तर घराघरात जाऊन आम्ही कामगारांना, वारकऱ्यांना  त्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. त्यांना बहुमताने निवडून आणावे हे आवाहन करणार आहोत. 
बुलढाणा शहरात सन्मान स्वतंत्र कामगार संघटनेकडे नोंदणीकृत असलेले 2000 अधिक  कामगार आहेत. त्यांच्या परिवाराचे मत सौ उर्मिलाताई सतीशचंद्र रोठे पाटील आणि पॅनलची निशाणी सिलेंडरलाच  पडेल हा विश्वास या पाठिंबाच्या निमित्ताने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख यूनूस यांनी व्यक्त केला आहे.
_

बुलढाणा 
दिनांक 24/11/2025

Post a Comment

0 Comments