Advertisement

उसरा-चालठाणा जाणारी बस वेळेवरच पाठवा.? आगार प्रमुख यांच्याकडे विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी..

उसरा-चालठाणा जाणारी बस वेळेवरच पाठवा...!

आगार प्रमुख यांच्याकडे विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी...!

जळगाव (जा.) :- बस स्थानका अंतर्गत मौजे उसरा-चालठाणा जाणाऱ्या बसचा वेळ सा.५.०० वाजता निश्चीत असुन ती बस कधीच वेळेवर लागत नसल्यामुळे शाळेकरी विदयार्थ्यांना विशेषतः मुलींना घरी

 पोहचण्यास मोठा रात्र होत आहे ज्यामुळे पालकांची चिंता वाढली असुन विदयार्थ्यांना मानसीक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे ही बाब लक्षात घेता जळगाव जामोद आगाराने उसरा-चालठाणा ही बस त्वरीत शाळेच्या वेळ पाहून पाठवावी तसेच विदयार्थ्यांना रात्र होण्याच्या आतच त्यांच्या घरी पोहचता यावे याकरिता आपण बसचे नियोजन करून नियमीत बस सूरु ठेवावी तसेच दर शनिवार ला उसरा-चालठाणा फाट्यावर बस थांबत नसल्यामुळे विदयार्थ्यांना वेळेवर शाळेत जाता येत नाही परिणामी काही विदयार्थ्यांना खाजगी वाहनाने जिवघेणा प्रवास करावा लागत आहे याचा परिणाम विदयार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे.

सदर मागण्या ह्या रास्त असुन विदयार्थ्यांच्या न्याय हक्काच्या आहेत त्यामुळे त्या तात्काळ मान्य करून पालक व विदयार्थ्यांना सहकार्य करावे अन्यथा पालकांना सोबत घेवुन तिव्र आंदोलन करण्यात येइल याची नोंद आगाराने घ्यावी असा ईशारा युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या वतीने देण्यात आला.

यावेळी अनीलसींह राजपुत,अजय गिरी,आकाश आटोळे,सै.शाहाबुददीन सै.तमीजोददीन,सोपान पाटील, सै.रियासोददीन सै.महेबबु, त्रिलोकसिंह राजपुत,गजानन व्यवहारे आदेश निंबाळकर तसेच बहुसंख्येने लोक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments