पळशी झाशी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत अंगणवाडीमध्ये स्नेहसंमेलन पालक मेळावा तसेच विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप कार्यक्रम संपन्न...
दिनांक 27 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत पळशी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत अंगणवाडी केंद्रामध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यामध्ये सर्व अंगणवाडीतील चिमुकल्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन विविध कार्यक्रम सादर केले यामध्ये स्वच्छता या विषयावर विशेष भर देण्यात आला.
पालक मेळाव्यामध्ये सरपंच व इतर मान्यवरांनी स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन करून गावातील स्वच्छता खूप महत्त्वाची असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री गौतमराव मारोडे सर उपस्थित होते, त्यावेळी गौतमराव मारोडे यांनी स्वच्छता तसेच गावात सुरू असलेल्या चांगल्या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांचे व ग्रामपंचायतचे कौतुक केले, त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एकूण 80 विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले,
त्यावेळी उपसरपंच पंचफुलाबाई पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष, करुणानंद तायडे, सुजित बांगर, शाळा समिती अध्यक्ष गिरी ताई उपाध्यक्ष चितोडे ताई, सुधाकर भाऊ शिरसोले, ज्ञानेश्वर भाऊ मारोडे, व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस आमले मॅडम, पूजाताई मारोडे, कल्पनाताई चितोडे, बेबीताई खुमकर, करांगडे मॅडम, उज्वलाताई बांगर, गवई मॅडम, अनिताताई बन्नतकार यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली.
0 Comments