Advertisement

वाडी ग्राम पंचायतमध्ये 40 लक्ष रुपयांच्या विविध रस्ता कामांचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते लोकार्पण

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वाडी ग्राम पंचायतचा कायापालट करु*
*माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा*
             *वाडी ग्राम पंचायतमध्ये 40 लक्ष रुपयांच्या विविध रस्ता कामांचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते लोकार्पण*
खामगाव /(संतोष आटोळे)          वाडी ग्राम पंचायत हद्दीमध्ये अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठया प्रमाणात आहे. वाडी या गावातील ग्रामस्थ प्रत्येक निवडणुकीमध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन मला प्रेम व आशिर्वाद दिलेले आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व बुलढाणा जिल्हयाचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून प्रथम टप्प्यामध्ये विकासनिधी आणुन वाडी गावात 40 लक्ष रुपयांची विविध विकास कामे करण्यात आली आहे. यापुढेही उर्वरीत रस्ते, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी साई मंदिराजवळ भव्य दिव्य सभामंडप यासह इतर आवश्यक कामे करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वाडी ग्राम पंचायतचा   कायापालट करण्यात येईल अशी ग्वाही  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिली.              रविवार दि.18 जानेवारी 2026 रोजी ग्राम वाडी येथे साई नगर,सुर्योदय नगर या ठिकाणी 40 लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या सिमेंट व पेव्हर ब्लॉक रस्ता कामाचा लोकार्पण सोहळा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते.


     या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील,प्रदेश सरचिटणीस गिरीधर पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख,बाजार समितीचे संचालक   विलाससिंग  इंगळे,वाडी ग्राम पंचायतच्या सरपंचा सौ.शितल तांगडे,उपसरपंच विजय बोर्डे,माजी सरपंच अजय खोद्रे, भागवत सोळंके, भगवानराव पाटील,मधुकरराव राऊत, तुषार जाजु सर, डावकर सर यांच्यासह ग्राम पंचायत सदस्यांची उपस्थिती होती. 
पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, वाडी गावात पाणी पुरवठयासाठी पाण्याची टाकी बांधण्यात आलेली आहे. परंतू पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली नसल्यामुळे गावात भीषण पाणीटंचाई होत आहे. गावकऱ्यांची पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी सुध्दा शासन दरबारी पाठपुरावा करुन लवकरच लोकांना नळाद्वारे स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यात येईल असे सानंदा यांनी सांगितले. आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीमध्ये वाडी गावातील नागरीकांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरुन प्रेम व आशिर्वाद द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
आपल्या प्रास्ताविकपर भाषणातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंजाबरावदादा देशमुख यांनी सांगितले की,  माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी आपल्या 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दी मध्ये लाखो कोटी रुपयांचा विकास निधी आणून शहरी व ग्रामीण भागातील विकास साध्ाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. वाडी गावातील साई नगर,सुर्योदय नगर यासह आदी भागांमध्ये  सिमेंट व पेव्हर ब्लॉकचे रस्ते, विद्युत पथदिवे ही सर्व कामे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या प्रयत्नातुन झालेली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सत्ता असतांना साई नगर भागामध्ये माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या माध्यमातून पाण्याची टाकी सुध्दा बांधण्यात आलेली आहे. साई मंदिराजवळ सामाजिक सभागृह झाल्यास या भागातील लोकांना साक्षगंध,लग्नसमारंभ,वाढदिवस यासारखे कार्यक्रम घेणे सोईस्कर होईल. म्हणुन साई मंदिराजवळ सभागृह बांधुन देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.   
सर्वप्रथम माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचे ग्राम वाडी येथील साई नगर भागामध्ये आगमन झाले असता ढोल ताश्यांच्या निनादात,  फटाक्यांची भव्य आतीषबाजी करुन ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. तद्नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील,माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते फीत कापून, नारळ फोडून  40 लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या सिमेंट व पेव्हर ब्लॉक रस्ता कामाचे लोकार्पण करण्यात आले. वाडी येथे विविध रस्ता कामांसाठी 40 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याबदद्ल सरपंच,उपसरपंच व ग्रामस्थांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा शाल व पुष्पहार घालुन सत्कार केला व त्यांचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो,आम्ही सर्व अजित पर्व, अजितदादा पवार  साहेब आगे बढो  बढो हम तुम्हारे साथ है,राणा दिलीपकुमार सानंदा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है  अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला किरण पाटील,गजाननराव चव्हाण, रामभाऊ उईके,विठठ्ल शिंदे, काटे पाटील, हभप विलास महाराज वाघमारे, भटकर काका,मयुर सातव, भास्करराव ठोसरे,सुरेशभाऊ ठोसरे, मंगेशभाऊ झगडे,भांबेरे पाटील, भारंबे पाटील, मुरलीधर देशमुख,महेंद्र चौधरी,निखील देशमुख,ललीत तांगडे, नवलसिंग बोराडे,सतीष तिवारी, महादेवराव हिंगणे, नाना हिवराळे, सुरेश केळोदे, भुलजी सैनी यांच्यासह साई नगर,सर्वोदय नगर व वाडी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments