Advertisement

हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना खामगाव शहर व तालुक्याच्या वतीने विनम्र अभिवादन*खामगांव/(संतोष आटोळे)

*हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना खामगाव शहर व तालुक्याच्या वतीने विनम्र अभिवादन*
खामगांव/(संतोष आटोळे)
            दिनांक २३/०१/२०२६ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त 23 जानेवारी ते ९ फेब्रुवारी शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसापर्यंत गाव संवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला असून ही यात्रा खामगाव विधानसभेतील १६१ गावांमध्ये फिरून शेतकरी शेतमजूर यांच्या समस्या समजून घेऊन केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व हिन्दू सेवक शिवसेना नेते अँड अमोल अंधारे यांचे नेतृत्वात शिवसेना संवाद यात्रा काढण्यात येणार असून  नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येतील तसेच संघटन बांधणी करण्याकडे विशेष लक्ष देण्यात येईल त्यामध्ये गांव तिथे शाखा व बूथ कमेटी निर्माण करणे शाखा उद्घाटन नवीन जुने पदाधिकारी शिवसैनिक यांच्या भेटी घेणे,पक्षप्रवेश करणे,शिवसेना सदस्य नोंदणी करणे व शेतकरी शेत मजूर  शोषित पीड़ित सर्व सामान्य कार्यकर्ता यांच्यासमाज उपयोगी विविध उपक्रम राबविण्यात येतील यात्रेमध्ये शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक शेतकरी शेतमजूर यांनी सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांनी केले.

हिंदू हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त अखंड हिंदुस्थानच्या राजकीय,सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रावर दीर्घकाळ प्रभाव टाकणारे,प्रखर लेखणी,स्पष्ट विचार आणि निर्भीड भूमिका यांचे प्रतीक असलेले हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त आयोजन केल्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.
हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या लेखन,व्यंगचित्र,संपादकीय आणि संघटनकौशल्याच्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसाला आत्मसन्मानाची दिशा दिली.
हिंदुत्व,राष्ट्रवाद आणि सामाजिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडत,कोणताही भेद न करता देशाशी निष्ठा ठेवणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विचार त्यांनी सातत्याने मांडला.
त्यांच्या विचारांनी, निर्णयांनी आणि कार्याने देशाच्या राजकारणात ठळक ठसा उमटवला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या विचारांना आणि कार्याला विनम्र अभिवादन करत करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिवसेना नेते अँड अमोल अंधारे,संजय अवताडे – जिल्हा उपप्रमुख,राजेंद्र रामदास बघे शिवसेना तालुका प्रमुख,शिवसेना शहर प्रमुख चेतन मोहनराव ठोंबरे,सुरेश वावगे शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख,शहर प्रमुख,राहुल पुंजाजी कळमकार युवासेना शहर प्रमुख,भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख धीरज कंठाळे,सौ.जयश्री ताई देशमुख महिला आघाडी तालुका प्रमुख,अनुसूचित जाती जमाती तालुकाप्रमुख प्रकाश हिवराळे,युवासेना तालुकाप्रमुख अमोल फेरंग, डॉक्टर अभिषेक महानकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख गोपाल भिल,सौ.श्रुती ताई पतंगे,सौ.ज्योतीताई भुजाडे,सौ.कल्पनाताई गायगोड,सौ.श्वेता पाटील, उपतालुकाप्रमुख बाळासाहेब पेसोडे,योगेश देशमुख,नामदेव बोंद्रे,अमोल बगाडे,निलेश देशमुख, विशाल साटोटे,विक्की सारवान विद्यार्थी सेना शहर प्रमुख,अनुसूचित जाती जमाती शहर प्रमुख मयूर खंडारे,अनिरुद्ध नेमाने,अँड सुनील अहिरे,तसेच शिवसेनेचे आशिष लांडगे,निलेश देवताडू,रवी माळवंदे,शिवसेना उपशहर प्रमुख भाऊ बिडकर,राहुल ठोंबरे,शहर संघटक उमेश तायडे,उपशहर प्रमुख करण छापरवाल,विकी घोडेचोर, विकी चुणेकर,साहिल चव्हाण,विभाग प्रमुख चेतन शलकर,गोपाल शेळके, पंकज अंबारे,यांच्यासह 
 शिवसैनिक,महिला शक्ती व सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments