*संवैधानिक हक्कासोबतच संवैधानिक कर्तव्य प्रामाणिकपणे बजाविले तरच भारत बलशाली होईल*
..... माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व टिळक राष्ट्रीय विद्यालयाच्या वतीने 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
खामगाव(संतोषआटोळे) प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे. या पावन दिनी भारतीय तिरंग्याला मानवंदना देवुन देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या थोर विव्दानाने भारतीय संविधान लिहण्याचे शिवधनुष्य उचलले आणि जगातील सर्वोत्तम असे भारतीय संविधान लिहले.दि.26 जानेवारी 1950 पासुन या संविधानाची देशात अंमलबजावणी सुरु झाली आणि भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र म्हणुन ओळखले जावु लागले.प्रत्येक भारतीयाने संवैधानिक हक्कासोबतच संवैधानिक कर्तव्य प्रामाणिकपणे बजाविले तरच भारत बलशाली होईल असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.
सोमवार दि.27 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यान येथे खामगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व टिळक राष्ट्रीय विद्यालयाच्या वतीने 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विश्वपालसिंह जाधव,ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहरअध्यक्षा सौ.शारदाताई शर्मा,खामगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मनोज वानखडे, नगरसेवक तहेसीन शाह,आबीद कुरेशी,संजय शर्मा, टिळक राष्ट्रीय विद्यालयाचे प्राचार्य संजय पातुर्डे गुरुजी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, सर्व भारतीयांनी राष्ट्रहित हेच श्रेष्ठहित आहे असे माणुन एकसंघ राहुन सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने एकत्रित रहावे व देशात शांतता नांदावी यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे असे सांगुन उपस्थितांना त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयाला माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व टिळक राष्ट्रीय विद्यालयाच्या वतीने पुष्पहार व तिरंगा दुपट्टा घालुन अभिवादन करण्यात आले.तद्नंतर प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रगीत होवुन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय, प्रजासत्ताक दिन चिरायु होवो, भारत माता की जय, वंदेमातरम, हम सब एक है अश्या घोषणा देवुन उपस्थितांनी एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व मान्यवरांच्या हस्ते टिळक राष्ट्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बिस्कीटे व चॉकलेटचे वितरण करण्यात आले. तद्नंतर टॉवर चौक येथील भारतरत्न स्व.राजीव गांधी उद्यानातील हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मनोज वानखडे यांनी केले.
या कार्यक्रमाला श्रीमती सुलोचना कळींगकर,अशोकबाप्पु देशमुख,शहर कार्याध्यक्ष केशव कापले, आनंद गायगोळ, धनंजय वानखडे,संतोष आटोळे,गजानन जाधव,निलेश बोराडे,पुरुषोत्तम शेजोळे,वासुदेवराव कानकिरड,दादाराव चोपडे,टिळक राष्ट्रीय विद्यालयाचे शिक्षक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments