*जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स, अँड गुंजकर कॉलेज आवार येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
77 वा भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आवार येथील जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स, गुंजकर कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज आणि गुंजकर वरिष्ठ महाविद्यालयात ध्वजारोहण सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलनाचा पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्थेचेअध्यक्ष तथा गुंजकर एज्युकेशन हब चे अध्यक्ष प्रा रामकृष्णजी गुंजकर यांनी भूषविले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेच्या सचिव सौ. सुरेखाताई गुंजकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खामगाव येथील सुप्रसिद्ध उद्योजक श्री. मदनजी राठी आणि श्री. महेंद्रजी आयलानी यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच आवार ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. आशाताई गवई आणि गावाचे पोलीस पाटील संदीप खराबे यांनीही व्यासपीठावर उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
ध्वजारोहण सोहळ्यानंतर, पार पडलेल्या 1 जानेवारी ते 12 जानेवारी आविष्कार 'वार्षिक स्नेहसंमेलन' (Annual Gathering) मधील विविध स्पर्धांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यशाचा आनंद ओसंडून वाहत होता.
उद्योजक श्री. मदनजी राठी यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांना उद्योजकतेची स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्रा.श्री. रामकृष्णजी गुंजकर यांनी सांगितले की, "विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे हेच आमच्या संस्थेचे मुख्य ध्येय आहे प्रा.गुंजकर सरांच्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना फोर डी सक्सेस चा मंत्र सांगण्यात आला जीवनात यशस्वी होण्यासाठी या नियमाचा उपयोग करा (१) डायरेक्शन (२) डेडिकेशन(३)डिसिप्लिन आणि डिझायर ही चार गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात केले तर विद्यार्थी उत्तुंग शिखरावर पोचू शकतात यात तीळ मात्र शंका नाही असे प्राध्यापक गुंजकर सर म्हणाले या कार्यक्रमाला सरपंच आशाताई गवई यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
स्कूलचे प्राचार्य श्री रविंद्र मांडवेकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. एम. रायबोले तसेच, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या सोहळ्यास उपस्थित होते. शिस्तबद्ध पद्धतीने सोहळा पार पडला.या कार्यक्रमाला शाळेचे पालक सुद्धा उपस्थित होते.
0 Comments