Advertisement

जय मल्हार संगीत कथा मंडळा तर्फे भारत गौरव पुरस्कार प्राप्त देविदास शर्मा यांचा सत्कार* खामगांव/(संतोष आटोळे)

*जय मल्हार संगीत कथा मंडळा तर्फे भारत गौरव  पुरस्कार प्राप्त देविदास शर्मा यांचा सत्कार* 
खामगांव/(संतोष आटोळे)
       खामगाव येथील सतिफैल परिसरातील  धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे. सेवा भावी  निस्वार्थी श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष  देविदास शर्मा यांच्या संकल्पनेतून मागील २६ वर्षा पासून भजनी मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात या मध्ये पुथपाथ वरील गोर गरीब लोकांना थंडीच्या दिवसात ब्लँकेट व गरम कपडे वाटप. पक्ष्यांची उन्हाळ्याच्या दिवसात पाण्या साठी होणारी भटकंती पाहता जल पात्र वाटप. सामान्य रूग्णालयात पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान. दिवाळीला गोर गरिब लोकांना मिठाई व कपडे वाटप.स्वच्छता अभियान .


वृक्षारोपण असे अनेक उपक्रम वर्ष भर राबविले जातात या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात असून देविदास शर्मा यांना इंडियन एक्सलेंन्स अवार्ड. भारत गौरव सर्वोच्च सम्मान पुरस्कार. महाराष्ट्र राज्य भुषण पुरस्कार. महाराष्ट्र बहुजन रत्न पुरस्कार. नॅशनल आयकॉन अवार्ड.  विश्वकर्मा समाज महाराष्ट्र रत्न राष्ट्रीय पुरस्कार .छत्रपती शाहू महाराज जिवन गौरव पुरस्कार.राष्ट्रहित सेवा गौरव पुरस्कार व अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्या बद्दल ११ जानेवारी २०२६ रोजी  जय मल्हार संगीत कथा वगनाट्य मंडळ दरेगाव च्या वतीने सामुहिक सत्कार करण्यात आला मंडळाचे अध्यक्ष सागर महाराज तुपकर यांच्या हस्ते देविदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा व यांचा शाल .टोपी व श्रीफळ देऊन  सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या उपस्थित मान्यवरांनी सुध्दा देविदास शर्मा यांना शुभेच्छा दिल्या

या प्रसंगी सेवानिवृत्त पी एस आय शेषराव जी अंभोरे साहेब. मंडळाचे अध्यक्ष सागर महाराज तुपकर.पांडुरंग गिरी. जनार्दन गिरी. विनोद वंगाळे . वंकर काळे. जगन्नाथ बंगाळे . अंबादास गाडे. मनोज बंगाळे. दिलीप झापर्ड. विनोद सुकाळे.अरूण कडवकर. राजु चिपडे . तेजस चिपडे. सतिष पोंदे . दिलीप कावरे. प्रज्योत कावरे. विजु चिपडे. समाधान सोनटक्के. आशु वेरूळकर . रामकृष्ण वेरुळकर. निखिल वानखडे. सुमीत खूळे.राहुल मिश्रा.अभिषेक झापर्डे .आदीत्य पाटील.तुषार चिपडे.रूपेश शर्मा.र्दिपाली चिपडे. राधा चिपडे. दुर्गा तळोले . विमल पोंदे. वैशाली कावरे. वर्षा वेरुळकर. पुजा पोंदे. 
परिसरातील  महिला. पुरूषांची उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments