Advertisement

राजमाता जिजाऊ माँ साहेब स्वराज्य संकल्पनेच्या आद्य शिल्पकार..माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा

*राजमाता जिजाऊ माँ साहेब  स्वराज्य संकल्पनेच्या आद्य शिल्पकार..माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात राजमाता माँ जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी*

खामगाव/(संतोष आटोळे)         राजमाता माँ जिजाऊंनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांच्या हदयात स्वराज्यप्रेम रुजविले.त्यांनी शिवरायांना प्रत्यक्ष युध्द कौशल्य शिकवित अन्यायाविरुध्द लढण्याची प्रेरणा दिली.त्यामुळे छत्रपती शिवरायांमध्ये बालपणापासुन प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला,पुढे छत्रपती शिवरायांनी 18 पगड जाती धर्मातील लोकांना सोबत घेवुन स्वराज्याची निर्मिती करुन इतिहास घडविला.त्यामुळे जगभरामध्ये छत्रपती शिवरायांचा नावलौकीक आहे.छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीच्या प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ मॉ साहेब हया खऱ्या अर्थाने स्वराज्य संकल्पनेच्या आद्य शिल्पकार आहे.राजमाता माँ जिजाऊंमुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. सोमवार दि.12 जानेवारी 2026 रोजी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  जनसंपर्क कार्यालय गांधी चौक खामगाव येथे  स्वराज्य प्रेरिका राजमाता मॉं  जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरअध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ.शारदाताई शर्मा,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठनेते पंजाबरावदादा देशमुख,नगरसेविका सौ.गायत्री तासतोडे,नगरसेवक तहेसीन शाह,माजी नगरसेवक ओम शर्मा,संजय शर्मा,कदमापूरचे माजी सरपंच पवन पवार  आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सांगितले की, राजमाता मॉ जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा घडविला.माँ जिजाऊंचे संस्कार,त्यांचे विचार आजही समाजासाठी दिपस्तंभासारखे आहे. तर स्वामी विवेकानंद यांनी संपुर्ण जगाला भारताची आध्यात्मीक ताकद दाखवुन दिली.सिंहानो उठा आणि लक्ष्य प्राप्ती होईपर्यंत थांबु नका असा संदेश देवुन त्यांनी युवकांना दिला.या दोन्ही महान व्यक्तीमत्वांच्या विचारांचा वारसा जोपासुन देशातील तरुणाईने राष्ट्रउभारणीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करुन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी उपस्थितांना राजमाता मॉ जिजाऊ  व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंजाबरावदादा देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, मातृतिर्थ बुलढाणा जिल्हा राजमाता मॉ जिजाऊंचा जिल्हा आहे. माँ जिजाऊंचे मातृत्व,शौय,धीरता,गंभीरता,सहनशीलता या पासुन महिलांनी प्रेरणा घ्यावी असे त्यांनी सांगितले.
सर्वप्रथम राजमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहरअध्यक्षा सौ.शारदाताई शर्मा व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला मुन्ना बोंद्रे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी जिजाऊ वंदना होवुन राजमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.उपस्थितांनी सुद्धा प्रतिमेला पुष्प अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन केले. जयंतीनिमित्त माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते उपस्थितांना लाडु वाटप करण्यात आले. यावेळी राजमाता माँ जिजाऊ साहेबांचा विजय असो,जय जिजाऊ-जय शिवराय,छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वामी विवेकानंद की जय, युवा दिन चिरायु होवो अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला शहर कार्याध्यक्ष केशव कापले,मुन्ना बोंद्रे,पिंटु जाधव,श्याम मोरे, वैभव वानखडे,आनंद गायगोळ, निलेश तासतोडे,अजय ठाकुर,हिदायत खान,जुबैर शाह,अन्वर बेग,प्रज्वल भारंबे,गजानन जाधव,सैयद फारुक,गणेशआप्पा इंगळे, श्यामसुंदर गायगोळ,पुरुषोत्तम शेजोळे,अवधुत टिकार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments