Advertisement

गो. से. महाविद्यालयात पतंगोत्सवास भरभरून प्रतिसाद खामगाव/(संतोष आटोळे)

*गो. से. महाविद्यालयात पतंगोत्सवास भरभरून प्रतिसाद
 खामगाव/(संतोष आटोळे)
     विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समितीच्या वतीने आयोजित “जागर स्त्री–पुरुष समानतेचा” सप्ताह (दि. ३ ते १२ जानेवारी २०२६) या विशेष सप्ताहात "G  S पतंगोत्सव" दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री प्रकाशजी तांबट,
 (उपाध्यक्ष वि. शि. प्र. मं. खामगांव) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माननीय सौ. श्रद्धाताई बोबडे, (सदस्या, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगांव) या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर सर होते. सप्ताह कार्यक्रमाच्या समन्वयक महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समितीच्या समन्वयक म्हणून डॉ. रेश्मा मारवाडी व  "G  S पतंगोत्सव" या कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. कोमल काळे यांनी जबाबदारी पार पाडली.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. स्त्री–पुरुष समानता, महिलांचे सक्षमीकरण, स्वावलंबन व सामाजिक जागृती या अत्यंत महत्त्वाच्या विषयांना केंद्रस्थानी ठेवून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले  होते
या सप्ताहांतर्गत सावित्रीबाई फुले जयंती, माँ जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती या प्रेरणादायी दिनांचे औचित्य साधत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले . यामध्ये पतंग उत्सव कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पतंग सजवीने, पतंग संदेश व घोषवाक्य, पतंग उडविण्याचा  अशा विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला 
कार्यक्रमाच्या उद्घाटक माननीय श्री प्रकाशजी तांबट,
(उपाध्यक्ष वि. शि. प्र. मं. खामगांव) यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्त्री–पुरुष समानता, महिलांचे सक्षमीकरण व शिक्षणाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.  डी. एस. तळवणकर सर यांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून नेतृत्वगुण विकसित करावेत तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक दृष्टीकोन अंगीकारावा, असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर
हा सप्ताह विद्यार्थ्यांमध्ये  आत्मविश्वास, स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रेश्मा मारवाडी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ बालासाहेब टकले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. उमेश खंदारे  यांनी केले. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. श्रद्धाताई बोबडे यांचे मार्गदर्शन लाभले. पतंग उत्सवामध्ये मुलांनी विविध प्रकारच्या रंगांची अनेक पतंग सादर केली व नंतर पतंग उडविण्याचा आनंद साजरा करण्यासाठी महाविद्यालयाच्या मैदानावर जमले व पतंग उडविण्याचा आनंद लुटला. या कार्यक्रमात पर्यावरण पूरक पतंग व कॉटन मांजाचा वापर करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ बालासाहेब टकले, प्रा उमेश खंदारे, प्रा. मनोज बाभळे, डॉ.  अनुराग बोबडे, डॉ. आशिष पटोकार, प्रा. नैना मिश्रा, कु. भाग्यश्री सापधारे, श्री. अभय मोहिते, श्री. विठ्ठल चंदनकर, श्री. नरेंद्र वाघ, रोहीत भोजने व धनराज अहीर यांनी मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments