*नगराध्यक्ष अपर्णाताई फुंडकर यांचा रा.च.महासंघ तर्फे सत्कार*
खामगाव -
*दिनांक १२ जानेवारी नगर परिषद खामगाव येथील सभागृहात राजमाता जिजाऊ माॅसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले.*
*तदनंतर राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडी व समाज बांधवांच्या वतीने खामगाव रजत नगरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ.अपर्णाताई सागर फुंडकर यांचा साडी,चोळी, शाल,बुके देऊन तसेच ऊर्मिलाताई ठाकरे यांचा 495 पेजेस* *"ज्ञानसंस्कार ग्रंथ" व* *''संघर्षातील ऊर्मी'' ग्रंथ देवून साहित्यिका तथा समाजसेविका रा.च.महासंघ महिला आघाडी च्या मा.राष्ट्रीय अध्यक्ष तथा सल्लागार मा. डॉ.ऊर्मिलाताई ठाकरे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सौ.संध्याताई पदमने व खामगाव तालुका प्रमुख सौ.ज्योतीताई वाघमारे यांनी यथोचित सत्कार केला व यावेळी निवेदनही देण्यात आले.याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेविका तथा माजी नगराध्यक्ष सौ.अनिताताई डवरे यांचाही सत्कार करण्यात आला.*
*यावेळी प्रास्ताविकात डॉ.ऊर्मिलाताई ठाकरे म्हणाल्या की, अपर्णाताई फुंडकर यांच्या माध्यमातून खामगाव शहराला उच्च शिक्षित,सुशिक्षित, सुसंस्कारित नगराध्यक्ष मिळाला आहे.आपल्या माध्यमातून खामगाव शहराचा विकास होण्यास निश्चितच मदत होईल,यात शंका नाही.*
*नगराध्यक्षताई आपल्याकडे समस्त चर्मकार समाजाची एक छोटीशी मागणी आहे , ती आपण निश्चितचपणे पुर्ण शकाल अशी आशा आहे, समाजाला एक दिशा व एक प्रेरणा मिळण्यासाठी संतांच्या धार्मिक आचार विचारांची अत्यंत गरज आहे. करिता खामगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महान कवी,समाज सुधारक संतश्रेष्ठ गुरु रविदास महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करून त्याचे सुशोभीकरण करण्यात यावे,अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडी व समस्त चर्मकार समाज बांधवांच्या वतीने यावेळी करण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष अपर्णाताई फुंडकर यांना सर्वानुमते निवेदनही देण्यात आले.*
*त्यानंतर समाज भगिनी संध्याताई पदमने यांनी "श्रावण क्वीन" म्हणून द्वितीय क्रमांक मिळाला त्याबद्दल व नुकताच डॉ.ऊर्मिलाताई ठाकरे यांना सिंदखेडराजा राजा येथे "जिजाऊ पुरस्कार" मिळाल्याबद्दल नगराध्यक्ष अपर्णाताई फुंडकर यांनी अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला.*
*क्रमशः सत्काराला उत्तर देताना अपर्णाताई फुंडकर म्हणाल्या की,आपण माझा सत्कार केल्याबद्दल आपले सर्वांचे आभार व्यक्त करते,पुढे त्या म्हणाल्या की, खामगांव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी संतश्रेष्ठ गुरु रविदास महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून सुशोभीकरण करावे,ही आपण केलेली मागणी पूर्ण करण्यासाठी मी कटिबध्द राहील,असे आश्वासन त्यांनी दिले.*
*यावेळी शहर अध्यक्ष प्रमिला निंबोळकर सचिव कुसूम पदमने,उप शहरप्रमुख वनिता निंबोळकर,सह सचिव शितल चिमणकर,रूपाली वाघमारे, सुनिता डांगे,ज्योती रोजतकर, प्रमिला निंबोळकर,सुवर्णा गव्हाळे, उषा चंदनकार,कामिनी चिम, शुभांगी इंगळे,कमलताई पदमने, रेखा निंबोळकर, सुनिता पानझाडे,सविता इंगळे,रंजना वाघमारे, निता वानखेडे, रंजना वाघमारे,अर्चना सोनोने,पुष्पा चिम,आशा शिंदे,चंद्रभागा सोनोने, रंजना पदमने, ऊर्मिला सोनोने, वैशाली शिंदे, स्नेहल सोनोने,संचिता शिंदे,मीरा डांगे...आदि महिला पदाधिकारी व सुभाष शिंदे, चंद्रकांत निंबोळकर,बाळू गव्हाळे,सतीश शिंदे, काशीराम वाघमारे, संजय डांगे, गणेश सोनोने,गजानन रोजतकार, सुर्यकांत निंबोळकर, गजानन पदमने,मनोज पानझाडे , प्रतिष्ठित नागरिक...आदि समाज बांधव व भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते*
*कार्यक्रमाचे संचालन काशीराम वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन रोजतकार यांनी केले.*
*कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला भगिनी व समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.*
0 Comments