*18 जानेवारीला लांजुड येथे सुटाळा - वाडी जिल्हा परिषद सर्कलचा भव्य सर्कल मेळावा व युवाप्रबोधनकार प्राध्यापक डॉ.प्रशांत महाराज ठाकरे यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन
जिल्हा परिषद सर्कल मेळावा व कीर्तन कार्यक्रमाला नागरिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आवाहन*
खामगाव /(संतोष आटोळे) महाराष्ट्र राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री तथा बुलढाणा जिल्हयाचे पालकमंत्री ना.मकरंदआबा पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मान्यता दिलेल्या ग्राम वाडी येथे 40 लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात येणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या विकासकामांचे रविवार दि.18 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आह, तसेच याप्रसंगी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सायंकाळी 5 वाजता ग्राम लांजुड येथे सुटाळा- वाडी जिल्हा परिषद सर्कलचा भव्य सर्कल मेळावा देखील आयोजित करण्यात आला आहे.
लांजुड येथे संत गजाजन महाराज सभागृहा जवळील भव्य प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा संपन्न होणार आहे. या सर्कल मेळाव्याला प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील, प्रदेश सरचिटणीस गिरीधर पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या सर्कल मेळाव्यानंतर लांजुड येथे सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अकोला येथील सुप्रसिद्ध वक्ते , कीर्तनकार आणि युवाप्रबोधनकार प्राध्यापक डॉ. प्रशांत महाराज ठाकरे यांचे शिव-शाहु-फुले-आंबेडकर-महात्मा गांधी-मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचारधारेवर आधारित राष्ट्रीय एकात्मता,व्यसनमुक्ती व अध्यात्मीकतेवर आधारित समाज प्रबोधनपर कीर्तन होणार आहे. प्राध्यापक, डॉ. प्रशांत महाराज ठाकरे हे त्यांच्या विश्वस्नेह फाऊंडेशन मार्फत निराधार मुलांच्या शिक्षणासाठी काम करतात , ते पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक विजेते असून त्यांनी झी टॉकीज, झी चित्र मंदिर, सोनी मराठी, सन मराठी आदी वाहिन्यांवर अनेक टी व्ही शो केलेले आहे तसेच यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मिडीया माध्यमांवर देखील त्यांचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. तरी वाडी येथे दुपारी 4 वाजता होणाऱ्या लोकार्पण कार्यक्रमाला आणि सायं.5 वाजता लांजुड येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद सर्कल मेळाव्याला आणि प्राध्यापक डॉ.प्रशांत महाराज ठाकरे यांच्या राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित कीर्तन कार्यक्रमाला सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व सर्कल मधील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खामगाव तालुका अध्यक्ष मनोज वानखडे, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश ताठे , सर्कल प्रमुख अनंता धामोडे यांनी केले आहे.
0 Comments