Advertisement

सलग तिसऱ्या वर्षी ‘बेस्ट स्कूल’ पुरस्काराने जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स व गुंजकर कॉलेज सन्मानित* खामगांव/(संतोष आटोळे)

*सलग तिसऱ्या वर्षी ‘बेस्ट स्कूल’ पुरस्काराने जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स व गुंजकर कॉलेज सन्मानित* 
खामगांव/(संतोष आटोळे)
        महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन (MESTA) तर्फे दिला जाणारा ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ सलग तिसऱ्या वर्षी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि गुंजकर कॉलेज आवार यांना प्रदान करण्यात आला आहे. हा मान मिळवणारी जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमातील ही एकमेव शाळा ठरली आहे.
      जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्सची स्थापना सन २०१७ मध्ये एका छोट्याशा आवार गावात करण्यात आली. अल्पावधीतच शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षण, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी ‘अविष्कार’ क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि कौशल्यांना चालना मिळत आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि इतर शाळांमधील महत्त्वाचा फरक म्हणजे येथे दर शनिवारी १०० गुणांचा ‘जी.के. बूस्टर’ पेपर घेतला जातो. यामागील उद्देश विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी तसेच आयएएस, आयपीएससारख्या स्पर्धा परीक्षांसाठी लहान वयापासूनच सक्षम करणे हा आहे. यासोबतच आठवड्यातून तीन दिवस सायन्स फाउंडेशनचे बेसिक क्लासेस घेतले जातात. नीट, जेईईसारख्या परीक्षांमध्ये विद्यार्थी मागे राहू नयेत आणि भविष्यात डॉक्टर व अभियंते घडावेत, या उद्देशाने विशेष पदव्युत्तर पात्रता असलेले शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. नियमित अभ्यासक्रमासोबत सायन्स फाउंडेशनचा अभ्यासक्रम राबवणारी जिल्ह्यातील ही एकमेव इंग्रजी शाळा असल्याची नोंद शिक्षण विभागानेही घेतली आहे. शाळेत सातत्याने नवकल्पना राबवण्यासाठी शिक्षक, प्राध्यापक आणि प्राचार्य यांचे एकत्रित प्रयत्न सुरू असतात. त्याचाच परिणाम म्हणून २०२४, २०२५ आणि २०२६ या सलग तीन वर्षांत जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि गुंजकर कॉलेजला ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले आहे.

हा सन्मान संस्थेसह सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी असून, भविष्यात याहीपेक्षा अधिक गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याचा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळवून देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे प्रा. रामकृष्ण गुंजकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments