Advertisement

युगधर्म पब्लिक स्कूलमधे स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन*खामगांव/(संतोष आटोळे)

*युगधर्म पब्लिक स्कूलमधे स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन*
खामगांव/(संतोष आटोळे)
         युगधर्म पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज मोठ्या उत्साहात आणि दिमाखात उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले सोनाली नगरे व चमु यांनी स्वागत गीताने  सर्वांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष गोपालजी अग्रवाल प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अनिलजी नावंदर (सेक्रेटरी, महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन) यांची उपस्थिती लाभली. तसेच शिवांगी ब्रेकर्सरसचे डायरेक्टर श्री. प्रकाशचंद्रजी केडिया हेही मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन सौ. स्वप्ना चव्हाण मॅडम व सौ. सपना रेठेकर मॅडम यांनी केले. प्रमुख पाहुणे श्री.अनिलजी नावंदर यांनी आपल्या भाषणात, खरे शिक्षक तेच असतात जे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य दिशा व प्रोत्साहन देतात, असे मत व्यक्त केले. यावेळी श्री. प्रकाशचंद्रजी केडिया यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यानंतर शाळेचे अध्यक्ष श्री.गोपालजी अग्रवाल यांनी आपल्या भाषणातून शिक्षणाचे महत्त्व व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. शाळेचे मुख्याध्यापक श्री.अनिरुद्ध अवचार सर यांनीही विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच संस्कार, शिस्त व आत्मविश्वास जोपासण्याचे मार्गदर्शन केले.


स्नेहसंमेलनाचा सविस्तर आराखडा रूपाली राठी मॅडम यांनी उपस्थितांसमोर मांडला. तदनंतर आजोबा आजी आणि आई-वडिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये संगीत खुर्ची ,अंताक्षरी ,गुपचूप ची पुढी आणि क्विझ, यामध्ये सर्व पालक व आजोबा आजींनी स्वच्छंदपणे सहभाग घेतला व आपल्या बालपणात रंगून गेले कूणी नाच , गाणी, जाहीरात,वाद,असे मनोरंजक कला सादर करत धमाल केली,कार्यक्रमाच्या शेवटी सौ. अंकिता राठी मॅडम यांनी  सर्व मान्यवरांचेआभार मानले.

Post a Comment

0 Comments