*खामागव नगर पालीकेने आकारलेले मालमत्ता कर कमी करण्यासाठी खामगाव शहर वासीयांनी पक्षभेद विसरुन सामुहिक लढा उभारण्याची गरज....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा*
खामगाव/(संतोष आटोळे) खामगाव शहरात एकीकडे घाणीचे साम्राज्य,अनियमित पाणी पुरवठा, निकृष्ट दर्जाची विकासकामे,रस्त्यांवर ठिक-ठिकाणी मोठ-मोठे खडड्े, खामगाव नगर पालीका कर्जबाजारी करुन निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्यांचे बांधकाम या प्रकारच्या कारभारावर खामगाव शहरवासी त्रस्त असतांना नगर पालीका 2025-26 आर्थिक वर्षासाठी मालमत्ता अवाजवी प्रस्तावित केल्यामुळे खामागाव शहरावासीयांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मालमत्ता कर दुप्पट तर काही ठिकाणी तिप्पट वाढविल्याने घर मालक,व्यापारी,मध्यमवर्गीय नागरीक,खुले भुखंड धारक, नागरीक आर्थिक अडचणीत सापडलेले आहे. अचानक करण्यात आलेल्या या करवाढीच्या प्रस्तावित बिलांमुळे नगर पालीकेच्या निर्णयावर सर्व ठिकाणी टिकेची झोड उठवली जात आहे. मालमत्तेची अवाजवी करवाढीचे बिले आल्यामुळे नागरीकांवर आर्थिक बोजा मोठया प्रमाणावर वाढणार आहे.
मालमत्ता धारकांच्या हरकतीवर अपील समिती मार्फत सुनावणी होणार आहे. अवाजवी मालमत्ता कर कमी करण्यासाठी खामगाव शहर वासीयांनी सामुहिक लढा उभारण्याची तयारी करुन सर्व पक्षभेद विसरण्याची गरज आहे.या बाबत खामगाव शहरातील तज्ञ मालमत्ता धारकांची एक समिती तयार करुन मालमत्ता धारकांना आलेल्या मालमत्ता करावर सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करुन मुदद्ेनिहाय हरकती नगर पालीकेसमोर नोंदवायचा आहे.नगर पालीका प्रशासनावर दबाव वाढविण्यासाठी खामगाव शहर वासीयांनी संघटीत होवुन व मालमत्ता धारकांना न्याय मिळवुन देण्यासाठी सामुहिक लढाईच्या माध्यमातून खामगाव नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन करुन, खामगाव बंद व वेळ प्रसंगी शासन दरबारी व न्यायालयात न्याय मिळण्यासाठी कायदे तज्ञांच्या माध्यमातून नागरीकांचा लढा यशस्वी होण्याच्या दृष्टीकोनातुन प्रयत्नाची पराकाष्ठा करु असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.
0 Comments