Advertisement

जालना ते वाशिम नवीन रेल्वेलाईनच्या मार्गासाठी सृष्टीच्या हेलीपॅडवर मकरंद आबा पाटील (पालकमंत्री) यांना नानासाहेब फाउंडेशन च्या वतीने दिले निवेदन.

जालना ते वाशिम नवीन रेल्वेलाईनच्या मार्गासाठी सृष्टीच्या हेलीपॅडवर मकरंद आबा पाटील (पालकमंत्री) यांना नानासाहेब फाउंडेशन च्या वतीने दिले निवेदन.



सिंदखेड राजा :- राष्ट्रमाता जिजाऊ माता जन्मोत्सवाच्या निमित्ताने मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान नानासाहेब फाउंडेशनच्या वतीने माननीय बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंद आबा पाटील/जाधव  मदत व पुर्नवसन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना हेलीपॅडवर निवेदन देण्यात आले. 

त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते गजानन भाऊ दराडे आणि नानासाहेब तौर यांच्या हस्ते सादर करण्यात आलेल्या या निवेदनात राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या नावाने जालना ते वाशिम


 सिंदखेडराजा,लोणार सरोवर, लोणी, रिसोड, वाशिम,अशी नवीन रेल्वे लाईन मार्ग निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे.व हा नविन रेल्वे लाईन मार्ग जालना–सिंदखेडराजा–दुसरबीड–लोणार सरोवर–लोणी–वाशिम असा सुमारे १५० कि.मी. लांबीचा प्रस्तावित रेल्वे मार्ग असुन जनसामान्यांच्या विकासासाठी किती महत्वाचा  आणि  किती लाभदायक असुन  अत्यंत महत्त्वाचा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच या रेल्वे मार्गासाठी गेल्या पाच वर्षांपासून नानासाहेब तौर फांऊनडेशनच्या वतीने महाराष्ट्र शासन दरबारी पाठपुरावा सतत सुरू असून, जन आंदोलन समितीच्या माध्यमातून ही मागणी अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हा रेल्वे मार्ग मराठवाडा व विदर्भाच्या विकासाला चालना देणारा ठरणारा असुन, दोन सांस्कृतिक व ऐतिहासिक शहरांची नाळ जोडणारा व नवपर्यटन निर्माण करणारा आहे.

जिजाऊंच्या सिंदखेड राजा चे वैभव  व संभाजी नगराच्या देवगिरी किल्ला व वेरूळ लेणीच्या वैभवात व जालन्याच्या स्टिल सिटी व सिड हब व ड्राय पोर्टेबिलिटीसाठी  अत्यंत महत्त्वाचा व नवी ओळख निर्माण  करण्यासाठी  मैलाचा दगड ठरेल असेही नमूद करण्यात आले.
करीता पालकमंत्री ना. मकरंद आबा पाटील यांनी निवेदन स्विकारून सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. व लवकरात लवकर हा रेल्वे मार्ग आपण महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन या महत्वाकांक्षी योजनेत समाविष्ट करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडून लवकर मंजुरी घेऊन राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या दूरदृष्टीच्या विचाराला समर्पित करू या,अशी ग्वाही दिली, त्यावेळी उपस्थितांमध्ये सिंदखेड राजा मतदारसंघाचे लोकप्रिय तरूण तडफदार व नवयुवकाचे आयडॉल,आमदार मा. मनोजभाऊ कायंदे ,रा. कॉ. पा. जिल्हा अध्यक्ष बुलढाणा,व रा कॉ पा. अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष,ऍड. नाझेर काझी, नगराध्यक्ष सौ. माधुरीताई शिपणे दे. राजा ,माजी नगराध्यक्ष देविदासभाऊ ठाकरे सि. राजा, श्यामभाऊ मेहेत्रे गटनेते सि राजा,रा. कॉ. पा.तालूका अध्यक्ष,सिध्दुभाऊ जाधव, नानासाहेब तौर फाऊंडेशनचे उपाध्यक्ष व भा.ज.पा .तालुका उपाध्यक्ष सुरेशभाऊ बुलकडे  तसेच इतर सामाजिक संस्थेचे अनेक सामाजिक कार्यकर्ते, सर्व दैनिक पत्राचे पत्रकार बंधु व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments