Advertisement

लाखणवाडी देवस्थान च्या नादुरुस्त रस्त्यामुळे=====गुणवंतबाबाचे दर्शन घेणे झाले अवघड =====अमरावती (अशोक वस्तानी )

लाखणवाडी देवस्थान च्या नादुरुस्त रस्त्यामुळे=====
गुणवंतबाबाचे दर्शन घेणे झाले अवघड =====
अमरावती (अशोक वस्तानी )
महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा म्हणजे अध्यात्मिकतेचे माहेर जरी ठरले तरि प्रशासन मात्र या अध्यात्मिकतेचे वैरी ठरले आहेत कि काय असा प्रश्न भाविकामध्ये निर्माण झालेला आहे 
 जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील महाराष्टभर प्रसिद्ध संत श्री गुणवंतबाबाचे समाधी स्थळ असलेले लखणवाडी चे चारही बाजूने येणारे रस्त्याची दुरावस्था भयानक झाली असून लोकप्रतिनिधीच्या खबूगिरीमुळे रस्त्याचे तीन तेराहाऊन भाविकासाठी जीवघेणे ठरत आहे 
 भ्रष्ठाचाराची किमया 
===============
कर्जगांव ते लखनवाडीच्या रस्त्यावरील भ्रष्टाचाराची किमया निरालीच आहे कर्जगांव येथील प्रतिष्ठित नागरिक राजूभाऊ कश्याप यांनी दिलेल्या माहिती नुसार एका माजी लोकप्रतिनिधीचे कार्यकाळात कर्जगांव ते लाखणवाडी रस्त्याचे एक नव्हे तर तबबल चार वेळा डबारीकरण करण्यात आले परंतु दरवर्षी पावसाळ्यात सदर रस्त्यातील भ्रष्टाचाराच्या जखमा बाहेर येऊन रस्ता जैसे ठेच्या स्थिती येतो तेव्हा पुन्हा भविकाची ओरड पाहता लोकप्रतिनिधी शासनाकडून निधी मंजूर करून पुन्हा डबारीकरण करून मतदाराची मन जिकूंन आपला कमिशनचा धंदा करिता गेले परंतु एका वर्षातच सदर रस्ता उखाडला कसा याबाबत सम्बन्धीट खात्याचे अधिकारीना लोकप्रतिनिधीने कधी जाब विचारला नाही कारण सर्वानी खेळीमेलीने भ्रष्टाचार करून रस्ताला कीड लावली होती अश्याच कमिशन खोरीमुळे सदर रस्त्याकरिता शासनाकडून दरवर्षी कोट्यावधीचा निधी मंजूरकरून सबंधित अधिकारी व नेत्यांनी निधीचा भंडारा करून भविकांना वाऱ्यावर सोडल्याचे आजही सदर रस्त्यावरील जखमा भाविकांना सांगत आहेत 
  सध्या भाजपचे लोकप्रिय आमदार म्हणून प्रवीणभाऊ तायडे यांना भाविकाची कडकडीची विनंती कि मागील पाच वर्षात सदर रस्त्याचे दुरुस्तीवर झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून भरस्टाचारीचे पिठलं उघड करावे व रस्त्याचे भाजपा पद्धतीने नविनकरण करावे अशी मागणी आता भाविक करिता आहेत
===================

गुणवंतबाबाचे लखनवाडीतील संस्थान हे जागृत ठरल्याने येथे स्मुरण राज्यभरातून भाविकाची सतत गर्दी असल्याने आमदार प्रवीणभाऊ तायडे व प्रशासनाने परतवाडा, लखणवाडी व कर्जगांव ते लाखणवाडी रस्त्याचे नूतनिकरण त्वरित करावे अशी भविकाच्या वतीने राजूभाऊ कक्ष्यप,तसेच धुनिवाले संस्थांनाचे प्रमुखसंदिपभाऊ सोनार, कुलदीप सोनार,यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments