Advertisement

केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापराव जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खामगाव विधानसभा पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची आढावा बैठक संपन्न खामगांव/(संतोष आटोळे)

केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापराव जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खामगाव विधानसभा पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची आढावा बैठक संपन्न 
खामगांव/(संतोष आटोळे)
      केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापराव जाधव साहेब यांच्या सूचनेनुसार शिवसेना खामगाव विधानसभा पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची आढावा बैठक संपन्न स्थानिक शिवसेना कार्यालय येथे दिनांक 11 जानेवारी रोजी संपन्न झाली या बैठकीचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री संतोषभाऊ डिवरे पाटील हे होते तर प्रमुख उपस्थितीत हिंदू सेवक अँड अमोल भाऊ अंधारे , शेगाव उपजिल्हाप्रमुख राजूभाऊ मिरगे,खामगाव तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, शेगाव तालुकाप्रमुख रामा धारकर , शिवसेना शहर प्रमुख चेतन ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते
    या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संतोषभाऊ डीवरे पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले की गाव तिथे शाखा, प्रत्येक घरात शिवसैनिक असा नारा दिला तसेच आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकीकरिता शिवसैनिकांनी सज्ज राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले प्रत्येक गावामध्ये बूथ निहाय शिवसैनिकांची यादी करावी, पंचायत समिती गणनिहाय सुद्धा शिवसैनिकांची वेगळी फळी निर्माण करावी व होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा फडकवावा अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.


 तसेच नुकताच शिवसेना पक्ष प्रवेश झाल्यानंतर उपस्थित एडवोकेट अमोल भाऊ अंधारे यांचा शिवसेना खामगाव विधानसभेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या निमित्य बोलताना अमोल अंधारे यांनी सांगितले मी सतत तीन दशकापासून हिंदुत्वासाठी संघटनेमध्ये काम करत आलेला आहे. यापुढेही करत राहणार परंतु हिंदुहृदय सम्राट , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे हिंदुत्वदी विचारांना प्रेरित होऊन व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे नेतृत्वावर हिंदुत्ववादी विचारावर विश्वास ठेवत व केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनात इथून पुढे ताकदीनिशी काम करण्याचा एक संकल्प केला. तसेच धर्मवीर आमदार संजय भाऊ गायकवाड ही आपल्या सोबत खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
ॲड अमोल अंधारे यांनी शिवसेनेमध्ये पक्ष केल्यानंतर प्रथमच भव्य पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन श्री हरी लॉन्स सुटाळा खामगाव येथे करण्यात आले असून हिंदुत्ववादी संघटनेतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संकेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख खामगाव राजेंद्र बघे यांनी सूत्रसंचालन करताना सांगितले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे नेतृत्व हे सर्व सामान्य नेतृत्व आहे. 
कुठलाही सामान्य कार्यकर्ता थेट केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या संपर्कात असतो व केव्हाही कॉल करतो तेवढेच नाही तर प्रत्यक्ष सुद्धा स्वतः कार्यकर्ते घेऊन आपले काम पूर्ण  करतो,कार्यकर्ता असो वा पदाधिकारी त्यांना मंत्री महोदय इतर नेत्यांसारखे  करतो पाहतो न करता थेट कॉल करून काम पूर्ण करतात. 
 त्यांच्याच नेतृत्वाला प्रेरित होऊन हजारो शिवसैनिक शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत विशेष म्हणजे हिंदू सेवक अँड अमोल अंधारे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केल्यामुळे शिवसेना खामगाव विधानसभेला नवीन नेतृत्व मिळाल्यामुळे युवकांचा शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात कल वाढलेला आहे. 
 प्रमुख उपस्थितीत दिनांक १७  जानेवारी 2026 रोजी खामगाव येथील श्रीहरी लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना मेळाव्याच्या नियोजनासाठी सविस्तर बैठक संपन्न झाली. यावेळी नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री,शिवसेनेचे मुख्य नेते तथा केंद्रीय मंत्री मा. श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेले ॲड. अमोल अंधारे यांची उपस्थिती लाभली.

यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू पाटील मिरगे,शिवसेना तालुकाप्रमुख शेगाव रामा पाटील थारकर,शिवसेना शहर प्रमुख चेतन ठोंबरे, शिवसेना महिला आघाडी  उपजिल्हाप्रमुख कावेरी ताई वाघमारे,महिला आघाडी तालुकाप्रमुख,जयश्री देशमुख,महिला आघाडी उपतालुकाप्रमुख ज्योतीताई बुजाडे,महिला आघाडी उपतालुकाप्रमुख श्वेताताई पाटील,सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपान वाडेकर,उपतालुकाप्रमुख गोपाल भील,उपतालुकाप्रमुख संतोष दुतोडे,उपतालुकाप्रमुख गजानन हुरसाड,उपतालुकाप्रमुख सागर मेतकर,अनुसूचित जाती जमाती तालुकाप्रमुख प्रकाश हिवराळे,पवन बरींगे उपजिल्हाप्रमुख,किसान सेना मंगेश गायकी उपजिल्हा प्रमुख, युवासेना,गणेश रहाटे तालुका समन्वयक,शेगाव मोहन लांजुडकर उपतालुकाप्रमुख,आशिष मिरगे,उपतालुका प्रमुख), अमोल जवंजाळ 
विभाग प्रमुख तसेच खामगाव विधानसभेतील सर्व आघाड्यांचे तालुका प्रमुख,उप तालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखाप्रमुख,आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments