Advertisement

बुलढाणा जिल्हा कोषागार कार्यालयात ACB मोठा दणका; 15000 ची लाच घेताना तिघे जाळ्यात...सौ गिता सोनोने

बुलढाणा जिल्हा कोषागार कार्यालयात ACB  मोठा दणका; 15000 ची लाच घेताना तिघे जाळ्यात...!
जिल्हा कोषागार कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झाला असून लाजलुचपत प्रतिबंधक विभागाने ( ACB ) आज एकाच वेळी तीन शासकीय कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. कौटुंबिक पेन्शन मंजूर करण्याच्या नावाखाली 15000रुपयाची लाच स्वीकारताना  अपर कोषागार अधिकाऱ्यासह दोन लिपिकांना ताब्यात घेण्यात आले आहे यातील तक्रारदाराचे वडील पोलीस विभागातून निवृत्त झाले होते ज्यांच्या 2025 मध्ये निधन झाले वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची कौटुंबिक पेन्शन आईच्या नावी सुरू करण्यासाठी तक्रारदार जिल्हा कोषागार कार्यालयात चकरा मारत होते मात्र हे काम करून देण्यासाठी तिथल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना 20000 रुपयांची  लाचेची मागणी  केली तक्रारदाराने या मागणीबाबत लाजलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्याकडे तक्रार नोंदवली 26 फेब्रुवारी रोजी लाचेचा मागणीच्या पडताळणी करण्यात आली ज्या मध्ये तडजोडीअंती 15000 रुपये घेण्याचे ठरले त्यानुसार आज 27 फेब्रुवारी 2026 रोजी कोषागार कार्यालयातच सापळा रचण्यात आला  तक्रारदाराकडून 15000 रुपये स्वीकारताना प्रवीण गोविंदराव मोंढे (वय45 )- अपर कोषागार अधिकारी बुलढाणा ( वर्ग -2 ) 2. विनोद अब्बास घटते ( वय43 )-
 लेखापाल/लिपिक ( वर्ग -3)
 3. जीवन पांडुरंग काळे
 ( वय 34 )-लेखा लिपिक ( वर्ग-3)   या तिघांनाही  रंगेहात पकडण्यात आले. ही धडाकेबाज कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि बुलढाणा ACB चे पोलीस उपाधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश पवार , विलास गुसिंगे , सहाय्यक फौजदार श्याम भांगे , पोहेंका प्रवीण बैरागी ,राजेंद्र क्षीरसागर, सुभाष माटे ,
दीपक जाधव ,अमोल झिने, पोलीस नाईक जगदीश पवार, पोलीस कॉन्स्टेबल रंजीत व्यवहारे, शैलेश सोनवणे 
लक्ष्मीकांत इंगळे, रतन गिरी  म . पोहेंका अनिता बारंगणे , स्वाती वाणी ,नितेश शेटे, अर्शद शेख या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.



आवाहन: जर कोणत्याही शासकीय लोकसेवा कामासाठी लाचेची मागणी करत असेल तर नागरिकांनी लाजलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्याशी किंवा टोल-फ्री क्रमांक 1064 व संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments