*अहिंसा,पशूप्रेम,स्त्रियांचा सन्मान, पर्यावरण संरक्षण,ज्ञान आणि विवेक,अंधश्रद्धा निर्मूलन हे सेवालाल महाराजांचे विचार आचरणात आणा- डॉ.रामपाल महाराज*
*जयराम गड:-* शिरला नेमाने येथे श्री संत सेवालाल महाराज जन्मोत्सवानिमित्त जयराम महाराज सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या वतीने दि. १२ फेब्रुवारी रोजी सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज व संदीप पाल महाराज यांचे शिष्य डॉ.रामपाल महाराज यांचे समाज प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम संत सेवालाल महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,श्री.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन हिवरखेड पोलीस स्टेशन चे ठाणेदार संदीप पाटील सर व प्रबोधनकार रामपाल महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
समजा प्रबोधन करत असताना डॉ.रामपाल महाराज यांनी सांगितले की सर्व समाज बांधवांनी समाजामध्ये वावरताना संत श्री सेवालाल महाराज यांची शिकवण अहिंसा,पशूप्रेम,स्त्रियांचा सन्मान, पर्यावरण संरक्षण,ज्ञान आणि विवेक,अंधश्रद्धा निर्मूलन हे सेवालाल महाराजांचे विचार आचरणात आणून जीवन जगा.तसेच व्यसनाच्या आहारी जाऊ नका, शिक्षनावर भर द्या इत्यादी सामाजिक कार्यावर महाराजांनी उद्बोधन केले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जयराम महाराज सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांनी परिश्रम घेतले. रामपाल महाराज यांचे सहकारी हार्मोनियम वादक सुनील गाईनकर,तबला वादक पंकज मिसळे,पवन कदम,सुखदेव चिंचोलकर हे होते.
0 Comments