* *खामगाव अर्बन बँक परिवाराच्या वतीने पुरस्कार स्वीकारल्याचा अभिमान* *अध्यक्ष विजय पुंडे*
* खामगांव/(संतोष आटोळे)
* नुकत्याच पार पडलेल्या खोपोली Iconic Leaders अवॉर्ड 2025 च्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात Banking Tech. Project Of the Year या विषयात Outstanding Implemetation इन Cyber Security या विषयात पुरस्कार प्राप्त झाला आहे.
* सदर पुरस्कार हा बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट नेतृत्व, नवकल्पना आणि अत्याधुनिक प्रगतिशील बँक म्हणून दिला जातो. बँकेचे अध्यक्ष प्रा. विजयजी पुंडे, मुख्य व्यवस्थापक श्री संतोष जाधव व सह व्यवस्थापक श्री आशिष दधीच यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
* खामगाव अर्बन बँक परिवाराच्या वतीने सदर पुरस्कार स्वीकारल्याचा सार्थ अभिमान वाटतो असे मनोगत बँकेचे अध्यक्ष प्रा. विजयजी पुंडे यांनी व्यक्त केले.
* खामगाव अर्बन बँकेने नेहमीच ग्राहकांना सुविधा देण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत नवकल्पना व अत्याधुनिक प्रगतिशील बँकिंग सेवा देत आहे व यापुढे अधिकाधिक तंत्रज्ञान युक्त तत्पर व सुरक्षा सेवा देण्याचा मानस आहे.
* बँकेने सभासद खातेदार यांच्याकडील ठेवींवर आकर्षक व्याजदर व कर्जावर माफक व्याजदरांच्या विविध कर्ज योजना सुरू केलेल्या आहे. त्यामुळे बँकेच्या नफा वाढीस फायदा झाला आहे. बँकेच्या स्वतःच्या जागेत अकरा शाखेत एटीएम सेवा कार्यरत असून यापासून स्थानिक ग्राहकांना व इतर बँकेच्या एटीएम धारकांना सदैव कॅश उपलब्ध करण्यात येऊन सेवा दिली जाते.
* त्याचप्रमाणे बँकेच्या ग्राहकांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत "चला डिजिटल होऊया" या ब्रीदवाक्यासह IMPS सुविधा,RTGS-NEFT, Toll Free Banking, SMS Alert व UPI सुविधा देणारी सहकार क्षेत्रातील विदर्भातील अग्रणी बँक आहे. तर पर्सनल चेक बुक फॅसिलिटी चे बँकेतच प्रिंट करून खातेदारास चेक वितरित करण्यात येते.
* खामगाव अर्बन बँकेस पुरस्काराने सन्मानित केल्याने सभासद ग्राहक संचालक मंडळ व कर्मचारी वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
*
*
0 Comments