*खेर्डा जिल्हा परिषद सर्कल मध्ये ऋषिकेश अमोल देशमुख यांचेसह शेकडो तरुणांचा आमदार डॉ संजय कुटे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न...*
जळगाव जामोद मतदारसंघाचे विद्यमान आमदार माजी मंत्री डॉ संजय कुटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाला प्रेरित होऊन खेर्डा जिल्हा परिषद सर्कलचे तरुण तडफदार युवा ऋषिकेश अमोल देशमुख यांचे सह असंख्य तरुणांनी भारतीय जनता पक्षात जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ संजयकुटे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाचा सोहळा पार पडला .यावेळी जळगांव जामोद नगर परिषद चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गणेश दांडगे, उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्या सह इतर नगरसेवकांचा सत्कार गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला.आपल्या भाषणात आमदार डॉ संजय कुटे यांनी जळगांव जामोद मतदार संघ पुढील 4 वर्षात बारामती मतदार संघाप्रमाणे विकसित करण्याचा मनोदय व्यक्त केला.आपण सर्व कार्यकर्ते आणि जनता माझी ताकद असून पुढील काळात मतदार संघातील प्रत्येक युवकाला रोजगार उपलब्ध करून देणार याची ग्वाही त्यांनी दिली.गोरगरीब आणि दिनदुबल्या लोकांची सेवा हीच देशसेवा आणि पक्षाचे धोरण असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते रामेश्वर उगले हे होते.तर प्रमुख उपस्थिती मध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख , जळगांव जामोद विधानसभा प्रमुख गजानन सरोदे, तालुका अध्यक्ष संजय पांडव, लोकनियुक्त नगराध्यक्ष गणेश दांडगे उपाध्यक्ष कैलास पाटील यासह नगरसेवकांसह गावातील भाजपा चे प्रमुख पदाधिकारी मंचकावर उपस्थित होते.
यावेळी ऋषिकेश अमोल देशमुख, गजानन उगळकार, माजी सरपंच
शिरीष वानखडे उपसरपंच खेर्डा खुर्द यासह ग्रामपंचायत सदस्य देवानंद वानखडे,ग्रामपंचायत सदस्य अमित देशमुख,ग्रामपंचायत सदस्य बाळू सोनेकर,सुजित देशमुख, गौरव वेलकर, स्वप्निल उमरकर, सुपा उमरकर, गोपाल राजाभाऊ देशमुख,शिवम नवघरे,देवा कुटे ,अशोकराव देशमुख, रमेशराव देशमुख, मधुकरराव देशमुख,अभिजीत देशमुख, दिलीप देशमुख ,विश्वंभर वेरुळकर, बाळु सोनवणे यांचेसह शेकडो युवकांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रकाश वाघ यांनी तर प्रास्ताविक प्रविण भोपळे यांनी केले.
0 Comments