Advertisement

घाटपुरी येथील जि.प. म.उ. प्राथमिक शाळेतील दिव्यांग विद्यार्थिनीला व्हील चेअर भेट**विभूते कुटूंबियाचा स्तुत्य उपक्रम*खामगाव(संतोष आटोळे)

*घाटपुरी येथील जि.प. म.उ. प्राथमिक शाळेतील दिव्यांग विद्यार्थिनीला व्हील चेअर भेट*
*विभूते कुटूंबियाचा स्तुत्य उपक्रम*
खामगाव(संतोष आटोळे)         खामगाव तालुक्यातील जि.प. म.उ. प्राथमिक शाळा घाटपुरी येथे शिकत असलेली कुमारी रोशनी सतिष खंडेराव हिला कुमारी सान्वी पंकज विभूते यांच्या वाढदिवसानिमित्त व्हील चेअर सप्रेम भेट देण्यात आली.
     यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून विराट मल्टिपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज नगरनाईक, पत्रकार मनोज जाधव, शाळा समिती अध्यक्ष सौ. अनुराधा बोडखे, व्यवस्थापन समिती सदस्य श्री. योगेश ढाले, सौ. संगीता ताई खांदे उपस्थित होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उषा पाखरे, शिक्षकगण सौ. गायत्री वरणकार, कुमारी अर्चना शुशिर, कुमारी ज्योती केवट यांचाही सहभाग होता.
ही व्हील चेअर कुमारी सान्वी यांच्या आजी तसेच शाळेच्या सहायक शिक्षिका सौ. सुनीताताई गजानन विभूते यांनी उपलब्ध करून दिली.
कार्यक्रमाच्या वेळी मनोज नगरनाईक यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “आपला आयुष्यातील स्वर्णिम दिवस कुठल्याही प्रकारचा वायफळ खर्च न करता, समाजातील वंचित आणि गरीब दिव्यांग व्यक्तींना जीवन जगण्यासाठी उमेद देणारी भेट देणे, हे खूप प्रेरणादायी असते. यासाठी हाच एक आदर्श असावा.“कार्यक्रमाचे समालोचन श्री सुरवाडे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी कुमारी रोशनी यांच्या आई प्रियंका सतिष खंडेराव यांच्या डोळ्यात अश्रू होते.
संपूर्ण कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांचे योगदान आणि सहकार्य महत्त्वाचे ठरले.

Post a Comment

0 Comments