*“बेस्ट एनसीसी इन्स्टिट्यूट” सन्मानाने गो. से. महाविद्यालयाचा अमरावतीत गौरव : कुलगुरू डॉ. मिलिंद बाराहाते व ब्रिगेडियर सचिन गवळी यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न*
विद्या भारती महाविद्यालय, अमरावती येथील सभागृहात राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) गट मुख्यालय, अमरावतीतर्फे आयोजित भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव यांना “बेस्ट एनसीसी इन्स्टिट्यूट” या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीचे कुलगुरू मा. डॉ. मिलिंद बारहाते उपस्थित होते. तसेच एनसीसी अमरावती ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर सचिन गवळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या सोहळ्यास कर्नल ओमेश शुक्ला, कमांडिंग ऑफिसर, १३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, खामगाव यांच्यासह ८ महाराष्ट्र बटालियन, 4 गर्ल्स महाराष्ट्र बटालियन, ६२ महाराष्ट्र बटालियन, ११ महाराष्ट्र, १८ महाराष्ट्र व ४७ महाराष्ट्र बटालियनच्या कमांडिंग ऑफिसर्सची उपस्थिती होती. अमरावती ग्रुपअंतर्गत येणाऱ्या विविध बटालियनचे अधिकारी, मान्यवर व एनसीसी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गो. से. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर "उत्कृष्ट प्राचार्य"" तसेच लेफ्ट. सुहास पिढेकर यांचा “उत्कृष्ट एएनओ” म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावर पीएम रॅली, थल सैनिक कॅम्प (टीएससी) आणि रिपब्लिक डे कॅम्प (आरडीसी), सायकल पीएम रॅली २०२६ यांसारख्या प्रतिष्ठित उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तसेच महाविद्यालयातील एनसीसी युनिटमधून मागील पाच वर्षांमध्ये ३८ एनसीसी कॅडेट्सची सैनिक तसेच अर्धसैनिक दलामध्ये निवड झालेली आहे. यांसारख्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.
कुलगुरू मा. डॉ. मिलिंद बारहाते यांनी आपल्या भाषणात एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण व देशसेवेची भावना विकसित होत असल्याचे सांगून गो. से. महाविद्यालयाच्या कार्याचे कौतुक केले. ब्रिगेडियर सचिन गवळी यांनी एनसीसी हे राष्ट्रनिर्मितीसाठी प्रभावी व्यासपीठ असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास विद्या भारती महाविद्यालयाचे प्राचार्य, एनसीसी अधिकारी, प्राध्यापकवृंद, विद्यार्थी व विविध बटालियनचे अधिकारी उपस्थित होते. या सत्कारामुळे खामगाव शहर व परिसरात महाविद्यालयाच्या कार्याचा गौरव होत असून विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा, शिस्त व नेतृत्वाची प्रेरणा अधिक दृढ झाली आहे. विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. सुभाषजी बोबडे, उपाध्यक्ष प्रकाशजी तांबट, सचिव मा. डॉ. प्रशांतजी बोबडे, कोषाध्यक्ष मा. अजिंक्यदादा बोबडे, सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे तसेच निसर्ग ग्रुप खामगावच्या अध्यक्षा सौ. निताताई बोबडे व मंडळाचे सर्व माननीय सदस्य, तसेच कर्नल ओमेश शुक्ला, कमांडिंग ऑफिसर, १३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, खामगाव, सुभेदार मेजर दिनेश कुमार, सुभेदार सचिन बोधे, सुभेदार नागोसिंग राठोड, सुभेदार रवन कुमार तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच एनसीसी कॅडेट्स यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करून सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. एनसीसी क्षेत्रातील सातत्यपूर्ण यशामुळे खामगाव व परिसरात महाविद्यालयाचे कौतुक होत असून विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा, शिस्त व नेतृत्वगुणांची प्रेरणा निर्माण होत आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
0 Comments