Advertisement

जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये विज्ञान प्रदर्शनातून उलगडले विज्ञानाचे विश्व!* *विद्यार्थ्यांनी साकारल्या ४२ महान वैज्ञानिकांच्या हुबेहूब प्रतिकृती*खामगाव(संतोषआटोळे)

*जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये विज्ञान प्रदर्शनातून उलगडले विज्ञानाचे विश्व!* 
      *विद्यार्थ्यांनी साकारल्या ४२ महान वैज्ञानिकांच्या हुबेहूब प्रतिकृती*
खामगाव(संतोषआटोळे)
          स्थानिक जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे 'राष्ट्रीय विज्ञान दिन' अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. डॉ. सी.व्ही. रमण यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आयोजित या सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि वैज्ञानिक जिद्दीला मोठे व्यासपीठ मिळाले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे शाळेत भरवण्यात आलेले भव्य विज्ञान प्रदर्शन. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी केवळ प्रयोगच मांडले नाहीत, तर जगाला बदलून टाकणाऱ्या ४२ महान वैज्ञानिकांच्या हुबेहूब प्रतिकृती तयार केल्या होत्या.  विद्यार्थ्यांनी या थोर शास्त्रज्ञांच्या जीवनावर आणि त्यांच्या अविस्मरणीय शोधांवर माहिती देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला आणि सादरीकरण कौशल्याला वाव मिळाला.

विद्यार्थ्यांकडून वैविध्यपूर्ण प्रयोग  या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध तत्त्वांवर आधारित अनेक नाविन्यपूर्ण प्रयोगांचे सादरीकरण केले. यामध्ये प्रामुख्याने सौर ऊर्जेवर चालणारी कार आणि पवनचक्कीचे मॉडेल, सांडपाणी व्यवस्थापन आणि 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'ची प्रतिकृती, स्मार्ट डस्टबिन आणि हायड्रोलिक ब्रिजचे कार्य, घरगुती साहित्यातून तयार केलेले व्हॅक्यूम क्लीनर आणि ज्वालामुखीचा उद्रेक या प्रयोगांचा समावेश होता.मार्गदर्शन आणि सन्मान
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर (संस्थापक, गुंजकर एज्युकेशन) यांनी विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले. आपल्या उद्बोधनपर भाषणात ते म्हणाले की, "विद्यार्थ्यांच्या अंगी उपजतच अनेक गुण असतात, मात्र त्या गुणांना पैलू पाडण्याचे काम शाळा आणि पालकांनी मिळून करणे आवश्यक आहे. प्रमुख अतिथी प्रा. सुरेखा गुंजकर यांनीही विज्ञानाच्या महत्त्वाबद्दल मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments