Advertisement

जळगाव जामोद तहसील कार्यालयात विष पिऊन एका व्यक्तीचे आत्महत्या करण्याचा प्रयत्न

जळगाव जामोद तहसील कार्यालयात विष पिऊन एका व्यक्तीचे आत्महत्या करण्याचा प्रयत्न


तहसिल कार्यालय जळगाव जामोद येथे वारंवार चक्रा मारून खरेदी नक्कल मिळत नसल्यामुळे एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न धोंडू केडूजी बावस्कार वय 67 वर्ष रा. दिघी ता.नांदुरा जि. बुलढाणा तहसिल कार्यालय जळगाव जामोद येथे 1981 ची खरेदी नक्कल करिता दिनाक 20/11/2025 रोजी अर्ज केला होता, परंतु आज रोजी 1.5 महीना झाले असूनही तहसिल कार्यालय जळगाव जामोद येथुन मला नक्कल मिळालेली नाही आहे. वारंवार चकरा मारूनही मला उडवाउडवी चे उत्तरे देत आहेत. आज देतो उद्या देतो म्हणुन माझी दिशाभुल करत आहेत. सदर नक्कल हि सहा एकराचा पुरावा म्हणुन कौशल्याबाई जगदेव सुर्यवंशी यांची खरेदी नकल आहे. 


सदर शेती बाबत तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे गोदावरीबाई जग्गन्नाथ चांडक हे आणि माझ्यात प्रकरण चालू आहे. सदर नक्कल मिळाल्यास मला या प्रकरणात न्याय मिळु शकतो त्या कारणामुळे तहसिल कार्यालयातील अधिकारी व चांडक यां दोघांनी संगनमत करून सदर नक्कल मला मिळाला नाही पाहिजे म्हणून हे सर्व कट कारस्थान उभे केले आहे. व तहसिल कर्यालायातून सदर खरेदी नक्कल संपुस्ठात आणण्याचा प्रयत्न केला आहे. सदर बाबी मध्ये तहसिल कार्यालयातील कर्मचारी सुद्धा सहभागी असुन त्या कारणाने मला खरेदी नक्कल मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे. सदर बाबीचा विचार करून मला न्याय देण्यात यावा. मि एक भूमिहीन शेतमजूर असुन सदर प्रकरण मंजुर करून मला न्याय देण्यात यावा व या विषयाची सखोल चौकशी करण्यात यावी. असे अर्जामध्ये नमूद केलेले आहे यांना कोणताही न्याय मिळत नसल्यामुळे आज धोंडू केडूजी बावस्कार वय 67 वर्ष रा. दिघी ता.नांदुरा जि. बुलढाणा यांनी तहसिल कार्यालय जळगाव जामोद येथे आपले कागदपत्र घेऊन तहसील कार्यालय मध्ये येऊन विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे

Post a Comment

0 Comments