*अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांना मिळालेल्या बिश्नोई लॉरेन्स चे शुभम लोणकर यांच्याकडून जिवे मारण्याच्या धमकीबाबत तात्काळ वाय दर्जाची सुरक्षा व एक स्कॉटिंग गाडी प्रदान करावी यासाठी खामगांव काँग्रेस कमिटी ने दिले निवेदन*
आम्ही आपणास गंभीर पूर्वक विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की दिनांक 17/02/2026 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्या मोबाईलवर एका एक कॉलिंग ॲपव्दारे कॉल आला समोरच्या व्यक्तीने बिश्नोई लॉरेन्स गँगचा शुभम लोणकर बोलत असल्याचे त्यांनी सांगितले दोन दिवसात 10 कोटी रुपये दे.नाही तर तुझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे स्व बाबा सिद्दिकी सारखा गेम करू अशा स्पष्ट शब्दात धमकी दिली आहे. प्राथमिक तपासात हा कॉल अमरीकेतील कॅलीफोर्निया येथून असल्याचे समोर येत आहे. शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी बुद्रुक येथील रहिवाशी आहे
शुभम लोणकर याने माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची आणि अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा संशय आहे अकोला पोलिसांनी यापूर्वी त्याला शास्त्र तस्करी प्रकरणात अटक केली होती त्यामुळे स्थानिक पातळीवर त्याचे जाळे सक्रिय असण्याची शक्यता येत नाही.या प्रकरणाचे गंभीर्य लक्षात घेता अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे साजिद खान पठाण बिश्नोई गँगचा शुभम लोणकर गुंड प्रवृत्तीच्या टोळीकडून जीवे मारण्याची दिली ही घटना अत्यंत गंभीर असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक आहे
लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साजिद खान पठाण सातत्याने महाराष्ट्रभर व इतर राज्यातील काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रवक्ते म्हणून सभेला संबोधित करतात त्याच बरोबर अल्पसंख्याक व दलित समाजाच्या हक्कासाठी लढतात
अशा परिस्थितीत त्यांना धमकी देणे म्हणजे लोकशाही मूल्यांवर थेट हल्ला आहे त्यामुळे त्यांच्या जीवितास निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही
करिता आपण या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन वाय दर्जाची सुरक्षा आणि सोबत एक पोलिस ची विशेष स्कॉटींग गाडी प्रदान करण्यात यावी अशी मागणी चे निवेदन खामगांव काँग्रेस कमिटी कडून करण्यात देण्यात आले.
निवेदन देतेवेळी खामगांव काँग्रेस कमिटी चे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होत.
निवेदनाच्या प्रतिलिपी
मा. ना. श्री देवेंदेजी फडणवीस
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महा राज्य, मा पोलीस महासंचालक
महा राज्य मुंबई,
मा विशेष पोलीस महानिरीक्षक
अमरावती परिक्षेत्र विभाग अमरावती,
मा जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा.
मा पोलीस अधीक्षक
पोलीस अधीक्षक कार्यालय बुलडाणा यांना देण्यात आल्या.
0 Comments