*बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यातील चिखला या गावातील छत्रपती शिवरायांचा पुतळा प्रकरणी झालेल्या वादात पुतळ्याचा बचावा करिता आलेल्या महिलाना विवस्त्र करून तसेच लहान मुलांना झुंड शाही करीत बेदम मारहाण करणाऱ्या समाजकंठकास कायदेशीर कारवाई करून कठोरात कठोर शिक्षा करणे बाबत खामगांव विधानसभा काँग्रेस कमिटी ने दिले निवेदन*
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला या गावात अत्यंत संतापजनक प्रकार घडला आहे.चिखला या गावात रयतेचे राजे,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला विरोध करत, गावातील काही देशद्रोही प्रवृत्तीच्या समाजकंठकानी शिवरायांचे स्मारक नष्ट करण्याचा नीच प्रयत्न केला आहे.तर या शिव स्मारकाचे रक्षण करण्यासाठी बसलेल्या शिवप्रेमी रणरागिणींना अत्यंत अमानवीय वागणूक देण्यात आली.
इतकेच नव्हे तर त्यांच्यावर दगडफेक सुद्धा केली,तर छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचा बचाव करणाऱ्या महिलांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आली व या सोबतच महिलांन सोबतच्या लहान लहान मुलांना सुद्धा मारझोड केली आहे.मा.जिजाऊंच्या जिल्ह्यात मा.जिजाऊच्या लेकींवरील हा अत्याचार,छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कधीही सहन केला जाणार नाही या अन्याय अत्याचाराचा आम्ही खामगांव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो व या प्रकरणी कसुन चौकशी करून दोषीं वर कायदेशीर कारवाई करून कठोरात कठोर शिक्षा करावी ही मागणी या लेखी योग्य ती कारवाई व्हावी या करिता सहकार्य करावे हि विनंती.
0 Comments