येत्या 23फेब्रुवारी 2026,सोमवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नगर परिषद मैदान, खामगांव येथे सकाळी 10.00ते 12.30 या वेळेत *श्री. सुधांशुजी महाराज* यांच्या सुमधुर वाणीतून सनातन भक्ती सत्संग कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात येणार असून त्यानिमित्त विश्व् जागृती मिशन ची संपूर्ण कार्यकारिणी व गुरुबंधू, गुरुभगिनी तसेच धर्मप्रेमी नागरिक यांची आढावा बैठक 31 जानेवारी ला सिंधी भवन येथे पार पडली.
सदर बैठकीचे यशस्वी आयोजन समितीचे (प्रधान)वामनराव लिखारे यांनी केले.
या बैठकीचे सूत्रसंचालन निमित्त मनोगत व्यक्त करतांना वामनराव लिखारे म्हणाले की,श्री गुरुदेवजी श्री सुधांशुजी महाराज यांचा 23फेब्रुवारी 2026 चा सनातन भक्ती सत्संग यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता सर्व गुरुबंधू, गुरुभगिनींनी तन, मन, धनाने सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आव्हान केले.
या बैठकीत आचार्य शिवदत्त जी तसेच आचार्य अभिषेक जी तिवारी यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमा प्रसंगी श्री. कमलकिशोर जी मंत्री, श्री बाबुलाल जी चुडीवाले, राजेशजी झापर्डे,मनीषजी खेतान, श्रीचंदजी पनपालिया,भीमसिंह पिंपळेकर, राजेश्वर राजपूत, महिला समितीच्या जयश्री लिखारे, चंदा ददगाळ यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजेश झापर्डे यांनी केले.त्यानंतर गुरुआरती करण्यात आली. तदनंतर उपस्थितांना प्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Comments