Advertisement

सुनगाव येथील स्मशानभूमीचे काम अंदाजपत्रक धाब्यावर ठेवून शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

सुनगाव येथील स्मशानभूमीचे काम अंदाजपत्रक धाब्यावर ठेवून शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

 जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत अंतर्गत येथे  जामोद रोडवरील खानी नदी नजीक चालू असलेल्या स्मशानभूमी काम हे महिनाभरा पासून सुरू आहे हे काम अंदाजपत्रक धाब्यावर ठेवून सुरू आहे या स्मशानभूमीचे काम हे कोणत्या निधीतून आहे किंवा कोणत्या विभागा मार्फत आहे याचे अंदाजपत्रक सुद्धा येथे लावलेले नाही व नामफलक सुद्धा लावलेले नाही शासकीय नियमानुसार कोणतेही काम सुरू करण्याच्या अगोदर तेथे नामफलक व अंदाजपत्रक लावने अनिवार्य असते परंतु शासकीय नियमांना डावलून हे काम सुरू आहे सदर काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून  असून या कामांमध्ये बांधकामाचे सर्व प्रकारचे मटेरियल हे कमी प्रतीत वापरल्या जात आहेत हे काम जिल्हा परिषद विभागामार्फत असल्याची चर्चा आहे परंतु जिल्हा परिषद बांधकामविभागाचे अभियंता सुद्धा या कामाकडे लक्ष देत त्यामुळे सदर कामावर असलेले अभियंता कर्तव्यात कसूर करीत असल्याचे निदर्शनास येत आहे  

तरी सदर कामाचे स्वरूप कालावधी ठेकेदार  नाव व अंदाजपत्रक या कामावर लावलेले नाही तसेच नाम फलक सुद्धा लावलेले नाही त्यामुळे सूनगाव येथे चर्चेला उधान आलेले आहे की सदर काम हे कोणत्या विभागामार्फत आहे व निधी किती याची चर्चा मात्र जोरात होत आहे तरी या कामाबद्दल पंचायत समिती व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी

Post a Comment

0 Comments