*बुलढाणा जिल्हा पोलीस दल १९८५ बॅच च्या वतीने 'महाराष्ट्र भुषण' देविदास शर्मा यांचा सम्मांन*
प्रत्येक व्यक्ती ही जन्माला येतांनांच स्वतः च वेगळ अस्तित्व घेऊन जन्मास आलेली असतात संबंध आयुष्य भर आपल जिवन समाजासाठी समर्पित करीत असते त्याने आयुष्य भरात केलेल्या उत्तम कार्याची ते कार्य मग लहान असो वा मोठे त्या कार्याची समाज नकळत दखल घेत असतो असेच वेगळ आणि आपल कार्य सिध्द करणाऱ्या समाजशिल व्यक्तिमत्वाचा सम्मान व्हावा म्हणून या करीता खामगाव येथील सतिफैल भागातील अगदी साधी राहणीमान. उच्चविचार सामान्य कुटुंबातील श्री सदगुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष देविदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांचे कार्य सुद्धा समाजा प्रती व राष्ट्रहिता प्रती खुप मोलाचे आहे सन 2000 पासून मुन्नाभाऊ शर्मा करीत असलेले कार्य सहजा सहजी इतर व्यक्तींना जमण्या सारखे नाही आणी त्यांच्या या निस्वार्थी प्रामाणिक. पारदर्शक कार्या बद्दल त्यांना
*भारत गौरव पुरस्कार . महाराष्ट्र भुषण. विश्वकर्मा महाराष्ट्र रत्न. बहुजन समाज महाराष्ट्र रत्न. छत्रपती शाहु महाराज जिवन गौरव. नॅशनल आयकॉन अवार्ड. इंडियन एक्सलेंन्स अवॉर्ड. असे अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने संम्मानित झाले आहे* त्या निमित्त १९ फेब्रुवारी २०२६ गुरवार रोजी देविदास शर्मा यांच्या सत्काराचे आयोजन ओलांडेश्वर संस्थान दुधा. ब्रम्हपुरी.मेहकर येथे करण्यात आले होते तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक बुलढाणा माननिय डॉक्टर श्री सत्यपाल सिंह यांचे कार्यकाळात माहे फेब्रुवारी १९८५ मध्ये जिल्हा पोलीस दलात समावून घेण्यासाठी रिकुमेंट परेडचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये ७५ यशस्वी उमेदवारांची वर्णी लागुन त्यांनी आता आपला सेवाकाळ पुर्ण केला आहे सेवाकाळत यातील बहुतांश अमलदार हे अधिकारी पदापर्यंत पोहचले यातील ६ जण पोलीस निरीक्षक तर 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक व सुमारे ४० हुन अधिक पोलीस उपनिरिक्षक म्हणून सेवा निवृत्त झाले आहेत तर काहींनी आपल्या पदाचा वेगळा ढसा उमटवला आहे तथापी आपल्या या प्रदीर्घ सेवा काळामध्ये एकमेकांचे जिवलग साथीदार राहिलेले हे शिलेदार आपली मैत्री विसरलेले नाही म्हणुन ते मैत्रीच्या या पर्वाचा दरवर्षी नियमित पणे १९ फेब्रुवारी रोजी मैत्रीचा स्नेह मिलन सोहळा साजरा करत असतात दिं १९ फेबुवारी गुरुवार रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेवराव कोयटे व सत्कार मुर्ती देविदास शर्मा यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला माल्यार्पण करून पुजन करण्यात आले तसेच मान्यवरांनी सुद्धा मुर्तीचे पुजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली या नंतर प्रमुख उपस्थितीत पोलीस अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला या नंतर खामगांव येथील सत्कार मुर्ती महाराष्ट्र भुषण देविदास शर्मा यांचा सर्व उपस्थित सेवा निवृत्त पोलीस अधिकारी यांच्या हस्ते शाल. हार. बुके व सम्मानपत्र देवून संमानित करण्यात आले या प्रसंगी मैत्रीचा स्नेहमिलन केक कापुन साजरा करण्यात आला
या नंतर सहभोजन घेवून कार्यकमाची सांगता करण्यात आली याप्रसंगी सेवा निवृत्त पोलीस अधिकारी अकील काझी. विजय मिरगे. शरद साठे. सखाराम कोरडे श्रीराम गेडाम. एकनाथ काळे. शेषराव अंभोरे. विजय उबाळे. दिगंबर अंभोरे. किरण साळवे. पुंडलिकराव देशमुख. नामदेवराव कोयटे. शालीकराम काळे. अविनाश भगत. सुरेश इंगळे. गजानन काकड. लडू सोनोने. नामदेव राठोड. मुस्ताकभाई. सुभाष जाधव. गजानन खार्डे. गुलाब इंगळे. सागर तुपकर. अशोक अंभोरे. मनसुखराव देशमुख. संतोष डुकरे. पुंजाजी इंगळे. पुरुषोत्तम माळेकर. संतोष खरात. संतोष परीहार. दत्ता राजेकर. संजय अंभोरे. सुभाष धोंडगे. मधुकर इंगळे. परमेश्वर वानखडे. गजानन खरात. सदानंद काकडे . शंकर इंगळे. सोपान शेवाळे. रामा काकडे. आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन किरण साळवे यांनी तर आभार प्रदर्शन गजानन खार्डे यांनी केले अशी माहीती बुलढाणा जिल्हा पोलीस दल १९८५ बॅच च्या वतिने देण्यात आली
0 Comments