Advertisement

भ्रष्टाचार निर्मूलन रस्ते संघर्ष समिती तर्फे दिनांक 6.3.2026 रोजी करणार धरणे आंदोलन

*भ्रष्टाचार निर्मूलन रस्ते संघर्ष समिती तर्फे दिनांक 6.3.2026 रोजी करणार धरणे  आंदोलन*
            ऊगवा फाटा ते खेकडी नवथळ परीतवाडा  आगर पाळोदी गोत्रा खांबोरा मंडाळा रेल्वे गेट ते अमानत टाकोळा खडकी भोळ बादलापूर माजरी कंचनपुर मालवाळा लोनाग्रा हातरून या रस्त्याचे डांबरीकरण व दोन पुल या रस्त्याचे काम साठी निधी मंजूर असून सुद्धा अद्याप पर्यंत कामे सुरू करण्यात आली नाही. वारंवार लेखी निवेदन देण्यात आले तसेच तोंडी सूध्दा चर्चा करण्यात आली फक्त खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण व दोन पुल या साठी निधी केंद्रीय मार्ग अंतर्गत मंजूर असून सुद्धा अद्याप पर्यंत कामे सुरू करण्यात आले नाहीत. निधी एप्रिल 25 पासून उपलब्ध आहे. सदरचे कामे सुरू न केल्याने दिनांक सहा 06/03/2026 रोजी आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाचे पत्र मा. नामदार रामजी शिंदे सभापती विधान परिषद मंत्रालयात मूंबई तसेच मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे,बाधकाम मंत्री मा श्रीकरजी परदेशी, सचिव मुख्यमंत्री कार्यालय. मा आकाश दादा फुंडकर पालकमंत्री अकोला.मा खासदार अनुपजी धोत्रे अकोला लोकसभा, मतदारसंघ मा नितीनजी देशमुख बाळापुर मतदार संघ, मा जिल्हाधिकारी अकोला, मा. उप जील्हाधिकारी अकोला, मा. पोलीस अधीक्षक अकोला,मा. ठाणेदार सिटी कोतवाली पोलिस स्टेशन अकोला,मा. रबिंद्रजी व्दिवेदि राष्ट्रीय अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती, मा. आयूक्त महानगर पालिका अकोला आपणाला विनंती कि त्वरित कामे सुरू करुन जनतेला वेठीस धरू नये. हा जो निधी मंजूर झालेला आहे तो जनतेचाच पैसा आहे जनतेला सूविधा पूरविणे हे शासनाचे काम आहे. तरी शासनाला विनंती कि त्वरित कामे सुरू करण्यात यावी असे एम के दिवनाले जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती अकोला यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments