गोंवींदगिरी महाराजांना अटक करण्यासाठी वारकरी धर्म परिषदेचा रास्ता रोको.
कारवाई न झाल्यास वारकरी धर्म परिषद आणखी आक्रमक आंदोलन करेल..
बुलढाणा/ मोताळा
ज्ञानोबा तुकोबा आणि ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथेबद्दल कथीत अभद्र वक्तव्य करणाऱ्या गोविंदगिरी महाराज उर्फ किशोर व्यास यांना अटक करून गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी वारकरी धर्म परिषद आक्रमक झाली आहे. अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष किशोर व्यास उर्फ गोविंद गिरी महाराज यांना अटक करण्यात यावे.या प्रमुख मागणीसाठी वारकरी धर्म परिषदेच्या वतीने राज्यभर तिव्र निषेध करण्यात येत आहे.
सामाजिक तेढ निर्माण करणे, दंगली घडविण्याचा प्रयास करणे, राष्ट्रसंतांचा अवमान करणे यासह विविध गुन्हे किशोर व्यास यांच्यावर दाखल करावे. अन्यथा महाराष्ट्रात वारकरी धर्म परिषद आणखी तीव्र आक्रमक आंदोलन करेल असा इशारा वारकरी धर्म परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वारकरी भूषण हभप वासुदेव महाराज शास्त्री, वारकरी धर्म परिषदेचे मुख्य संयोजक हभप अँड सतीशचंद्र पाटील, हभप सचिन महाराज येरळीकर, हभप प्रल्हाद महाराज राऊत, हभप परमेश्वर महाराज घनोकार, हभप राहुल महाराज वाकीकर, हभप शंकर महाराज शिंबरे,हभप निनाजी महाराज खोडके, गोविंद महाराज शिंबरे, यांच्यासह शेकडो वारकरी तीन मार्चला दुपारी मलकापूर बुलढाणा महामार्गावर वाघजाळ फाटा नजीक रस्त्यावर उतरत रास्ता रोको करीती व निदर्शने केली.
वारकरी धर्म परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जवळपास अर्धा तास रास्ता रोको निर्देशने करीत चक्का जाम केला होता.किशोरजी व्यास उर्फ गोविंद गिरीजी महाराजांना अटक झालीच पाहिजे. कारवाई झालीच पाहिजे यासह ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत तीव्र निदर्शने करीत रस्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलन स्थळी बोराखेडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी निवेदन स्वीकारले. ठाणेदार मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना निवेदन देत गुन्हे दाखल करण्याची तक्रार सुद्धा सादर केली आहे.
0 Comments