Advertisement

तुमचे प्रश्न, आमची जबाबदारी* *– समाधान* *तुमच्या दारी’* *“छत्रपती शिवाजी महाराज* *महाराजस्व समाधान* *शिबीर”* *अभियानाचा शुभारंभ*

*तुमचे प्रश्न, आमची जबाबदारी* *– समाधान* *तुमच्या दारी’* 

 *“छत्रपती शिवाजी महाराज* *महाराजस्व समाधान* *शिबीर”* *अभियानाचा शुभारंभ* 
खामगाव:- दि०४(उमाका) महाराष्ट्र शासनाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार तळागाळातील नागरिकांच्या प्रलंबित महसुली व इतर शासकीय सेवा एकाच ठिकाणी, एकाच दिवशी उपलब्ध करून देण्यासाठी तहसील कार्यालय खामगावच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान –टप्पा क्र.१” आयोजित करण्यात आले आहे. महसूल विभाग,पंचायत समिती, नगरपालिका,आरोग्य विभाग तसेच शासनाच्या विविध विभागांशी संबंधित सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आणि प्रलंबित प्रश्न तत्काळ निकाली काढणे हा या अभियानाचा उद्देश आहे. मंडळनिहाय शिबिरे घेऊन नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
शिबिरात मिळणाऱ्या सुविधा 

प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे डिजिटल ७/१२ व ८-अ उतारे वितरण सिंगल विंडो क्लिअरन्स प्रणालीद्वारे तात्काळ सेवा उत्पन्न, रहिवास, जात, नॉन-क्रिमीलेअर आदी प्रमाणपत्रांचे वितरण सामाजिक अर्थसहाय्य योजनांसाठी अर्ज स्वीकृती व मंजुरी ई-मोजणी, पीएम किसान (लँड सीडिंग, आधार सीडिंग, ई-केवायसी)
जिवंत ७/१२’ मोहिम कृषि, आरोग्य, पंचायत समिती, महिला व बालविकास तसेच नगरपालिका विभागांतर्गत विविध योजना
शिबिरांचे वेळापत्रक ७ मार्च २०२६ – आवार, पिंपळगाव राजा
१४ मार्च २०२६ – अटाळी, पारखेड १० एप्रिल २०२६ – पळशी बु., जनुना १७ एप्रिल २०२६ – अडगाव, हिवरखेड
८ मे २०२६ – खामगाव, वझर
१५ मे २०२६ – लाखनवाडा बु., काळेगाव खामगाव तालुक्यातील सर्व नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांनी या समाधान शिबिरास उपस्थित राहून महाराष्ट्र शासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार सुनिल पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments