*वाईटा वर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक होळी - - देविदास शर्मा*
*श्री सदगुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतिने होळी उत्सव संपन्न*
होळी हा हिंन्दु धर्मातील वसंत ऋतुतील एक प्रमुख सण आहे. जो फाल्गुन पोर्णीमेला साजरा केला जातो या सणाला शिमगा असे सुध्दा म्हणतात. होळीच्या पहिल्या दिवशी होळी पेटवून होलीका दहन केले जाते. जे वाईटा वर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. तर दुसऱ्या दिवशी धुळवड आणि रंगाची उधळण करून आनंद साजरा केला जातो. हिरण्य कश्यपु नावाच्या राजाचा मुलगा प्रल्हाद हा विष्णु भक्त होता हिरण्य कश्यपुने आपली बहीण होलीका जिला अग्णीत जळण्याचे वरदान होते हिच्या मांडीवर प्रल्हादाला बसवुन अग्णीत जाळण्याचा प्रयत्न केला.मात्र विष्णुच्या कृपेनें प्रल्हाद वाचला आणी होलीका जळुन भस्म झाली. ही वाईटावरील चांगल्याच्या विजयाची आठवण म्हणून होळी साजरी केली जाते.असे कार्यक्रम प्रसंगी देविदास शर्मा यांनी सत्संगातून बोलले.
सतिफैल परीसरातील श्री सदगुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 26 वर्षा पासुन विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविल्या जात आहे दिं 3 मार्च 2026 मंगळवार रोजी स्व गोपाल ठाकूर यांच्या वाड्यात होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते चंद्रग्रहण असल्यामुळे दुपारी 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत श्री शिवाय् नमस्तुभ्यमं 1008 वेळा सामुहीक जप. नामस्मरण करण्यात आले नंतर अबिर गुलाल एकमेकांना लावून होळी साजरी करण्यात आली या प्रसंगी मंडळाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा. दिलीप झापर्डे. विनोद सुकाळे.अरूण कडवकर.लालाजी सांगळे.विनोद चिमणकर. सचिन ठाकूर. सागर ठाकूर. प्रमोद गायकवाड. दादा ठाकूर. विनोद ढवळे. विजय गायकवाड.आशा अंधारे.सुशिला आवलकर.पार्वती सुकाळे. शकुंतला ढवळे.संगिता वाघोळे.शोभा ठाकूर. प्रिती ठाकूर. स्वाती गायकवाड. शालिनी ठाकूर. डॉली ठाकूर. सरला गौर. दुर्गा ठाकूर. मानु शर्मा. नायरा ठाकूर. मनिषा पवार. शितल चिमणकर. कमल कोमुकर. आशा दिपके. वच्छला कुटे. कोकीळा जाधव व परीसरातील महीला पुरूषांची उपस्थिती होती अशी माहिती श्री सदगुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
0 Comments