Advertisement

छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन संघटन मजबूत करा....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा* *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंपर्क कार्यालय येथे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी* खामगाव/(संतोष आटोळे )

*छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन संघटन मजबूत करा....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा* 
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंपर्क कार्यालय येथे तिथीनुसार  छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी*  
खामगाव/(संतोष आटोळे )          छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलामध्ये अठरा पगड जाती-धर्मातील जीवाला जीव देणारे निष्ठावंत सैन्य सामील होते. त्याच सैन्याच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत मजबूत आणि शिस्तबद्ध संघटन उभे केले. प्रतिकूल परिस्थिती असतांनाही शिवाजी महाराजांनी एकजुटीच्या बळावर स्वराज्याची भक्कम पायाभरणी केली. शिवरायांचे संघटन कौशल्य, दूरदृष्टी आणि सर्वसमावेशक नेतृत्व आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांच्या  आदर्शातून प्रेरणा घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजूट ठेवत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.
शुक्रवार दि.0 6 मार्च 2026 रोजी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जनसंपर्क कार्यालय येथे उत्साहात साजरी करण्यात आली,त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना ते बोलत होते.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख, शहराध्यक्ष श्रीमती सरस्वतीताई खासणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खामगाव तालुका अध्यक्ष मनोज वानखडे, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाष पेसोडे, बाजार समिती संचालक विलाससिंग इंगळे,राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे खामगाव तालुकाध्यक्ष बिलाल खा पठाण, संजूभाऊ शर्मा,मोहनभाऊ परदेसी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीतील पारतंत्र्याचा अंधार कायमचा दूर करून स्वराज्य निर्मितीचा ध्वज फडकविला. महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभे केले, मात्र ते करतांना त्यांनी कधीही रयतेवर अन्याय होऊ दिला नाही. एक कुशल प्रशासक, अर्थतज्ञ आणि प्रजाहितदक्ष राजा म्हणून छत्रपती शिवरायांची  जगभर ओळख आहे. आजच्या आधुनिक काळातही छत्रपती शिवरायांचे विचार समाजासाठी तितकेच मार्गदर्शक ठरत आहेत, असे सांगून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपस्थित त्यांना शुभेच्छा दिल्या. 
यावेळी ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी  हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे, तरुण-शेतकरी आणि सर्व समाजघटकांच्या हितासाठी त्यांनी राबविलेली कार्यपद्धती आजही जगासाठी आदर्श आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनीही प्रतिमेसमोर पुष्प अर्पण केले. यावेळी  शिवजयंतीनिमित्त माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते उपस्थितांना पेढे वाटप करण्यात आले.याप्रसंगी   छत्रपती शिवाजी महाराज की जय,हर हर महादेव,जय भवानी जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष केशव कापले, पुरुषोत्तम शेजोळेे, गजानन जाधव, कृष्णा नाटेकर, सुरेश बोरकर, निलेश तासतोडे, आनंद गायकवाड, प्रफुल कुळकर्णी, अविनाश ढगे, संतोष आटोळे, तुषार राणा,निलेश शर्मा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments