Advertisement

खामगांव अर्बन बँक कर्मचारी दत्त उपासक मंडळाचे वतीने पक्षांकरीता जलपात्राचे वितरण*खामगांव /(संतोष आटोळे)

*खामगांव अर्बन बँक कर्मचारी दत्त उपासक मंडळाचे वतीने पक्षांकरीता जलपात्राचे वितरण*
खामगांव /(संतोष आटोळे)
खामगांव अर्बन बँक कर्मचारी दत्त उपासक गणेशोत्सव मंडळाचे वतीने दरवर्षी गणेशोत्सव काळात
पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा केला जातो, उत्सवादरम्यान विविध सांस्कृतीक, कौटुंबिक व सामाजीक कार्यक्रम
घेण्यात येत असतात. तसेच मंडळाच्या वतीने अनावश्यक खर्चात कपात करून वर्गणीतील शिल्लक राहणारी रक्कम
गरजु गौरक्षणातील गौमातेच्या चारा-पाण्यासाठी देणे, गरजु विद्यार्थ्यांकरीता वह्या-पुस्तकांचे वाटप करणे, अशा
समाजोपयोगी कार्य करण्याचा प्रयत्न करुन टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षी
उन्हाची तिव्रता लक्षात घेवून शिल्लक वर्गणीतून दि.०६/०३/२०२६ संकष्ट चतुर्थीचे दिवशी फरशी चौक, खामगांव येथे
पक्षांकरीता मोफत जलपात्रांचे मंडळाच्या वतीने पक्षीप्रेमींना वितरण करण्यात आले. याप्रसंगी ज्यांच्या कामामुळे हा

उपक्रम राबविण्याची प्रेरणा मिळाली असे पक्षी व पर्यावरण रक्षणाकरीता कार्य करीत असलेले अ. खि. नॅशनल
हायस्कूलचे श्री. संजयजी गुरव सर, श्री. चितारे सर, सामाजीक कार्यकर्ते श्री. देविदास शर्मा, नेहमी सहकार्य करीत
असलेले बँकेचे अध्यक्ष प्रा. विजयजी पुंडे सर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ज्ञानेश्वरजी जाधव साहेब यांचे पुष्पगुच्छ
देवून स्वागत करण्यात आले.
यावेळी श्री. चितारे सर यांनी मनोगत व्यक्त करतांना खामगांव अर्बन बँकेच्या सामाजिक बांधिलकी व
मंडळाच्या उपक्रमाची स्तुती केली तर श्री. गुरव सर यांनी हृदयस्पर्शी कवितेतून पक्षीप्रेम व्यक्त केले. कर्मचारी मंडळाच्या
या उपक्रमाचे कौतुक करतांना बँकेचे अध्यक्ष प्रा. विजयजी पुंडे सर म्हणाले की, सृष्टीतील प्रत्येक जीव ऐकमेकास पुरक
असून मातीच्या जलपात्राचा भाव जरी कमी असला तरी जलपात्र देणारे व घेणारे दोघांचेही पक्षाप्रती असलेले भावना अनमोल आहे. वाढत्या उन्हाची चाहूल लक्षात घेता खामगाव  अर्बन बँकेच्या मंडळाने केलेल्या या सामाजिक उपक्रमास उपस्थित त्यांनी शुभेच्छा दिल्या.
            यावेळी मुख्य व्यवस्थापक संतोष जाधव बोर्ड सचिव राजू जुनारे कर्मचारी मंडळाचे पदाधिकारी किरण बेठेकर अभय दिडे आणि त्यास उज्जैनकर निखिल देशपांडे ते हरसिंग भिलाला प्रकाश सोनवणे गजानन म्हात्रे प्रकाश कळस्कर रुपेश ठोंबरे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments