Advertisement

सहयोग क्रेडिट सोसायटी तर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार....

सहयोग क्रेडिट सोसायटी तर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार....

जळगाव जा :- जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव जामोद शहरातील सहयोग क्रेडिट सोसायटीतर्फे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ७ मार्च रोजी विविध क्षेत्रातील महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला....
   सहयोग बँकेचे बँक मॅनेजर निलेश तायडे  सर यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन जळगाव पोलीस स्टेशन मधील पी.एस.आय शेंडगे मॅडम, पोलीस हेड कॉन्स्टेबल पाचपोर मॅडम व इतर महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्याचबरोबर चैतन स्कूल मधील आरती वाघ मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांचा तसेच ग्रामीण कोटा बँकेमधील संपदा तायडे व त्यांचे सहकारी महिला आणि  जळगाव बस डेपो मध्ये कार्यरत असलेल्या महिलां कर्मचाऱ्यांचाही यावेळी  त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहयोग बँकेचे  निलेश तायडे BOMvसरांनी बँकेकडून राबवल्या जाणाऱ्या एफ डी, डी डी, आर डी, सेविंग अकाउंट योजना बाबत माहिती दिली.

   यावेळी संयोग बँकेचे अभय काथोटे BO रोशन घाटे RO,गोविंदा बावस्कर BDE, विशाल गायकी BDO, पवनकुमार  तायडे OB,पवन गोंड BDO  प्रगती गव्हांदे BDO, वनिता भोपळे BDO. सहयोग बँकेचे सहकारी सोबत होते...

Post a Comment

0 Comments