Advertisement

जागतिक महिला दिनानिमित्त पंचशील होमिओपॅथिक महाविद्यालय रुग्णालयातर्फे महिलांकरिता औषधोपचार शिबिराचे आयोजन*खामगांव /(संतोष आटोळे )

*जागतिक महिला दिनानिमित्त पंचशील होमिओपॅथिक महाविद्यालय रुग्णालयातर्फे महिलांकरिता औषधोपचार  शिबिराचे आयोजन*
खामगांव /(संतोष आटोळे )
                जागतिक महिला दिनानिमित्त पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय खामगाव जिल्हा बुलढाणा तर्फे आहार विषयक मार्गदर्शन तथा औषध उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
          सदर शिबिर हे दिनांक 4 ते 7च्या दरम्यान सकाळी 9.30ते दुपारी 1वाजे पर्यंत यावेळेत आयोजित केले आहे.
          जागतिक महिला दिनानिमित्त महिला आरोग्य विषयक मार्गदर्शन रोग निदान मोफत होमिओपॅथिक औषधोपचार तसेच महिलांच्या रक्ताचे प्रमाण योग्य उपचार फिजिओथेरपी उपचार व आहार विषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात महिलांचे आरोग्य  तपासणी शिबिरात वायू व दमा, एलर्जी,वांग,खाज,खरुज, किडनीचे आजार,मुतखडा, चेहऱ्यावरील डाग पिंपल्स नेहमी येणारा ताप,स्त्रियांचे मासिक पाळीतील आजार, केसांचे आजार, मणक्याचे आजार, पाठ,कंबर,मान दुखी,मूळव्याध, भगंदर इत्यादी आजारांवर मोफत होमिओपॅथिक औषधोपचार करण्यात येईल व आवश्यकतेनुसार ज्या महिला रुग्णांना उपचाराची आवश्यकता आहे त्यांना महाविद्यालयाचे बाह्य रुग्ण(OPD) व आंतर रुग्ण( IPD)उपचार सुरू ठेवण्यात येईल.

         ज्या महिला रुग्णांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे त्या रुग्णांची तीन महिने मोफत होमिओपॅथिक औषध करण्यात येईल. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त महिला रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक समितीतर्फे करण्यात आले आहे 
                महिलांकरता Walkathon 2026 स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार दिनांक 8 मार्च 2026 सकाळी 5:15 वाजता पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज नाथ प्लॉट, खामगाव येथे ठेवण्यात आली आहे.स्पर्धेची  नोंदणी दिनांक 7 मार्च 2026 दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. ही स्पर्धा फक्त महिलांकरिता निशुल्क ठेवण्यात आली आहे.
        स्पर्धेचा मार्ग पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज ते जलंब नाका ते गोकुळ नगर मार्गे थेटे हॉस्पिटल ते नाना नानी पार्क ते जलंब नाका ते पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज असा राहणार आहे  या स्पर्धेचे अ, ब, क असे तीन गट राहणार असून प्रथम पारितोषिक 3100/- द्वितीय पारितोषिक 2100/- तर तृतीय पारितोषिक 1100/-राहणार आहे.
            ह्या स्पर्धेत वयोगटाची अट असून अ गट 12 ते 30 ब गट 39ते 50,क गट 50 च्या वर असे आहे. 
          तरी स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments