युद्ध परिस्थिती व देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील संकट पाहता येत्या खरीप हंगामामध्ये मोठी खत टंचाई निर्माण होण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा देशवासीयांना टंचाईचा सल्ला देत असताना शेतकऱ्यांनी खते जपून वापरावीत असा निर्देश दिला आहे.
भारताला मोठ्या प्रमाणामध्ये आजही खतांसाठी लागणारा कच्चामाल व अनेक खते परदेशातून आयात करावी लागतात. आंतरराष्ट्रीय परिस्थिती व भारतीय परकीय चलनाची गंगाजळी पाहता येत्या काळात खतांसाठी सरकार पुरेसा खर्च करू शकेल अशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांना खतांबाबत काटकसरीचा सल्ला दिला जात आहे.
मात्र यानुसार खरोखरच भीषण खत टंचाई निर्माण झाली तर त्याचा अत्यंत वाईट परिणाम येणाऱ्या खरीपावर होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि अन्नधान्याचे उत्पादन यामुळे मोठ्या प्रमाणात कमी होईल. अन्नधान्याचे उत्पादन कमी झाल्याचा सरळ परिणाम देशाची अन्नसुरक्षा धोक्यात येण्यात व महागाई वाढण्यामध्ये होणार आहे.
असे होऊ नये यासाठी केंद्र व राज्य सरकारने आत्ताच तातडीने पावले टाकावीत. खत निर्मितीसाठी पुरेसा कच्चामाल योग्य दरामध्ये उपलब्ध होईल व पुरेशी खत निर्मिती होऊन शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात खत टंचाईचा सामना करावा लागणार नाही यासाठी कठोर प्रयत्न करावेत असे आवाहन किसान सभा करत आहे.
0 Comments