माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी घेतला मोटर सायकल रॅलीमध्ये सहभाग
खामगाव /(संतोष आटोळे ) छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मराठा पाटील युवक समितीच्या वतीने गुरुवार दि.14 मे 2026 रोजी भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर रॅलीला सुरूवात करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी उपस्थित राहुन आकर्षक अश्वमेध रथामध्ये असलेल्या छत्रपती संभाजी राजे यांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी मराठा पाटील युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष श्रीमती सरस्वतीताई खासणे, खामगाव तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाष पेसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष केशव कापले, मुन्ना बोंद्रे, निलेश तासतोडे, अभय कुळकर्णी आदी उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी मराठा पाटील युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे यांचा भगवा दुपटट्ा व पुष्पहार घालुन सत्कार केला व लाडु भरवुन त्यांचे तोंड गोड केले.छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथुन प्रारंभ झालेल्या या मोटर सायकल रॅलीमध्ये सुध्दा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सहभाग घेतला.
ही मोटर सायकल रॅली सरकी लाईन, अर्जुन जल मंदिर, जगदंबा चौक, मोहन चौक, फरशी मार्गे सुटाळपुरा भागात पोहचली असता याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला मार्ल्यापण करून अभिवादन करण्यात आले.तद्नंतर घाटपुरी नाका, महाकाल चौक, रायगड कॉलनी, कोर्ट चौक समोरुन टॉवर चौक, बसस्थानक, कोठारी फैल, ग्रामिण पोलीस स्टेशन या मार्गाने ही रॅली मराठा पाटील समाज सभागृह येथे पोहचली. या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान महापुरुषांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. ठिकाठिकाणी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्या वतीने रॅलीचे आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले. तसेच थंड पेयाचे वितरण करण्यात आले. रॅलीमध्ये महिला व तरूणींचा लक्षणीय सहभाग होता.
0 Comments