Advertisement

लोकनेते स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त 21 जुलै रोजी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन

*लोकनेते  स्व. अजितदादा पवार  साहेब  यांच्या  जयंतीनिमित्त  21 जुलै रोजी सुप्रसिद्ध कीर्तनकार  ह.भ. प. निवृत्ती  महाराज इंदुरीकर  यांचे  कीर्तन  कार्यक्रमासह जनसेवा  सप्ताह मध्ये विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन*
         *हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा...... माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा*
खामगाव (संतोष आटोळे)           महाराष्ट्राचे माजी  मुख्यमंत्री , लोकनेते स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त दि. 21 जुलै ते 28 जुलै 2026 या कालावधीत खामगाव विधानसभा मतदार संघांमध्ये  ‘ जनसेवा सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात  लोककल्याणाच्या उदात्त भावनेतून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, धार्मिक व विकासाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.
या जनसेवा सप्ताहाची सुरुवात मंगळवार, दि.21 जुलै 2026 सायंकाळी 6 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान, खामगाव येथे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक ह.भ. प. निवृत्ती  महाराज इंदुरीकर  यांच्या कीर्तनाने होणार आहे. याप्रसंगी देवगिरी ते देवराई  या कार्यक्रमांतर्गत 5 हजार वृक्षांचे वाटप व वृक्ष संवर्धनाचा संकल्प घेण्यात येणार आहे.बुधवार, दि. 22 जुलै 2026 रोजी लोकनेते स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीदिनी सकाळी  9 वाजता सामान्य रुग्णालय खामगाव येथे रुग्णांना फळ व बिस्किट वाटप लॉयन्स क्लब संस्कृती अन्नछत्र येथे गरजूंना भोजन वाटप,  सामान्य रुग्णालय खामगाव येथे भव्य रक्तदान सुद्धा पार पडणार आहे. सायंकाळी  6  वाजता  श्री महादेव संस्थान जवळील, सुटाळा बु. ग्राम पंचायतचे प्रांगण येथे  राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य  सप्त खंजिरी वादक संदीप पाल महाराज यांचा कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच याप्रसंगी सुटाळा - वाडी जिल्हा परिषद सर्कलचा सर्कल मेळावा , ग्राम शाखा उद्घाटन, जनसंपर्क अभियान अभियान ,  गुरुवार,  दि. 23 जुलै 2026 रोजी  सकाळी  11 वाजता  खामगाव  रेल्वे  स्थानक  येथे श्री विठ्ठल दर्शन एक्सप्रेसने  पंढरपूरसाठी जाणाऱ्या  वारकरी बांधवांना फराळ पाकीट , छत्रीचे वाटप, दुपारी 1 वाजता भव्य रोगनिदान शिबीर, शुक्रवार, दि. 24 जुलै 2026 रोजी   सकाळी 9 वाजता शहरातील प्रभाग क्रमांक 12 व 13 मध्ये स्वच्छता अभियान व शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.दुपारी  2 वाजता  पिंपळगाव  राजा  येथे    50 लक्ष रुपये किंमतीच्या  विविध विकासकामांचे

 भूमिपूजन, लोकार्पण व घड्याळ वाटप , स्वतंत्र सेनानी स्व. हसनराव  देशमुख  सभागृह  पिंपळगाव राजा  येथे ,  पिंपळगाव राजा - जळका भडंग जिल्हा  परिषद चा  सर्कल  मेळावा  आयोजित करण्यात आला आहे.   शनिवार, दि. 25 जुलै 2026 रोजी  आषाढी एकादशी दिनी जलंब - माटरगाव जिल्हा परिषद सर्कल मध्ये 50 लक्ष रुपये किंमतीच्या  विविध विकास कामाचे भूमिपूजन, ग्राम शाखा उद्घाटन, जनसंपर्क अभियान व घड्याळ वाटप कार्यक्रम तद्नंतर सायंकाळी 7 वाजता हनुमान मंदिरचे प्रांगण , आठवडी बाजार माटरगाव बु.येथे  सुप्रसिद्ध कीर्तनकार दुर्गेश्वरी सोलव यांचा राष्ट्रीय एकात्मता व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर कीर्तन कार्यक्रम , रविवार, दि. 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता बोथा फॉरेस्ट शिवारात वृक्षारोपण , कार्यकर्ता मेळावा व वन भोजन ,  सायंकाळी  6 वाजता लाखनवाडा बु. येथे 50 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन,  लोकार्पण , ग्राम शाखा उद्ाघटन व जनसंपर्क अभियान तसेच हनुमान मंदिर जवळील प्रांगण येथे लाखनवाडा पंचायत समितीचा सर्कल मेळावा , सोमवार, दि. 27 जुलै 2026  रोजी  सायंकाळी 6 वाजता  महात्मा  फुले सभागृह , पळशी  बु. येथे जिल्हास्तरीय खंजेरी स्पर्धा,  अटाळी - पळशी सर्कल मध्ये  विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण , जनसंपर्क अभियान ,   मंगळवार,  दि. 28 जुलै 2026 रोजी  सायंकाळी 5 वाजता  गणेशपूर  येथे  30 लक्ष रुपये किंमतीच्या  विविध  विकासकामांचे  भूमिपूजन, लोकार्पण, ग्राम शाखा उद्घाटन व घड्याळ वाटप तसेच श्री संत गजानन महाराज मंदिर, गणेशपूर येथे   गणेशपुर - कुंबेफळ जिल्हा परिषदचा सर्कल मेळावा संपन्न होणार आहे.
  सेवाव्रती , विकासप्रेमी लोकनेते स्व.अजितदादा पवार पवार साहेब  यांच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी जनतेच्या सेवेसाठी आणि  समाजहितासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या जनसेवा सप्ताहात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमांना यशस्वी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खामगाव विधानसभा अध्यक्ष  पुंजाजी टिकार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सेवादलाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष  देवेंद्रदादा  देशमुख , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खामगाव शहरअध्यक्ष श्रीमती सरस्वतीताई खासणे , खामगाव तालुकाअध्यक्ष मनोज वानखडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. शारदाताई शर्मा ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष बिलाल खा पठाण, शेगाव तालुका अध्यक्ष संजय गव्हांदे , शेगाव पंचायत समिती माजी सभापती विजय काटोले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments