Advertisement

आमदार डॉ. संजय कुटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; जळगाव जामोद तालुक्यातील पाच गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा.. सौ गीता सोनोने

आमदार डॉ. संजय कुटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; जळगाव जामोद तालुक्यातील पाच गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा.. सौ गीता सोनोने

कुऱ्हा-वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत सन २००६ ते २०१३ या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यातील संपादित जमिनींच्या भूधारक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयासाठी २२ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, आमदार डॉ. संजय कुटे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आल्याचे सांगितले जात आहे.
या संदर्भातील जलसंपदा विभागाच्या सचिव तथा अध्यक्ष असलेल्या कार्यकारी समितीची बैठक १७ जुलै २०२६ रोजी पार पडली. बैठकीत संबंधित शेतकऱ्यांना एकूण २२.७१ कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले.
या निर्णयाचा लाभ जळगाव जामोद तालुक्यातील इस्लामपूर, हाशमपूर, नावखुर्द, गौलखेड आणि गोराडा येथील त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, ज्यांच्या जमिनी धरणरेषा व बुडीत क्षेत्रासाठी सन २००६ ते २०१३ या कालावधीत शासनाने संपादित केल्या होत्या. संबंधित शेतकऱ्यांना हे अनुदान लवकरच वितरित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या निर्णयाची माहिती मिळताच लाभार्थी शेतकऱ्यांनी आमदार डॉ. संजय कुटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार केला व आभार व्यक्त केले. यावेळी आमदार डॉ. कुटे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी “गिरीश महाजन साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments