*भर पावसातही रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - 30 रक्तदाते हजर, 25 जणांचे रक्तदान*
*दिनांक 22/07/2026*
_खामगांव :- एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन_ आणि _महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना_ यांच्या वतीने *संस्थापक अध्यक्ष रुग्णसेवक सुरजभैय्या एस. यादव* यांनी दिनांक 20 रोजी व्हाट्सअप ग्रुपवर केलेल्या आवाहनाला रक्तदात्यांनी तातडीने प्रतिसाद दिला आहे.
*"एकनिष्ठा रक्तदाता महाराष्ट्र" या व्हाट्सअप ग्रुपद्वारे आतापर्यंत हजारो रुग्णांना एक नवीन संजीवनी मिळाली आहे.* शासकीय रक्तपेढीमध्ये रक्ताचा भीषण तुटवडा असल्याने काल आणि परवा करण्यात आलेल्या आवाहनानंतर *30 रक्तदाते* रक्तदानासाठी हजर झाले काही खाजगी मध्ये रक्तदाते यांनी रक्तदान केले.
त्यापैकी *25 रक्तदात्यांनी रक्तदान केले.* काहींचे बीपी वाढल्याने, काही अनफिट असल्याने, तर काही औषधी घेत असल्यामुळे त्यांना तात्पुरते रिजेक्ट करण्यात आले. तरीही त्यांनी पुढील वेळी नक्की रक्तदान करू असे आश्वासन दिले.
संकलित करण्यात येणारे रक्त *थैलेसिमिया ग्रस्त मुले, सिकेल सेल योद्धे, अपघातग्रस्त रुग्ण, प्रसूती झालेल्या माता आणि अनिमिया आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी* अत्यंत मोलाचे ठरणार आहे. याबत *संस्थापक अध्यक्ष रुग्णसेवक सुरजभैय्या एस. यादव* म्हणाले,
"भर पावसाळ्यातही रक्तदाते घरातून बाहेर पडून रक्तदानासाठी आले. हीच खरी मानवतेची सेवा आहे. या ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत *25 रुग्णांना* थेट रक्त उपलब्ध करून दिले आहे. तुमच्या 15 मिनिटांमुळे अनेक कुटुंबांना नवीन जीवन मिळाले आहे. प्रत्येक रक्तदाता हा देवदूत आहे. सर्वांचे मनापासून आभार."
*सहभागी 25 रक्तदात्यांची नावे:* 1. अनिरुद्ध पाटील 2. रुपेश कापडे 3. निलेश अंबाळकर 4. गोपाल सायखेडे 5. लक्ष्मण कंडारकर 6. ज्ञानेश्वर मुऱ्हेकर 7. सागर देशमुख 8. कुणाल कदम 9. सुनिल खंडारे 10. शुभम चाकोते 11. मंगेश केनेकर 12. शिवकुमार अटरावलकर 13. अर्जुन सोनोने 14. पवन शर्मा 15. श्रीकृष्ण मुऱ्हे 16. अमोल चौकसे 17. योगेश इंगळे 18. कृष्णा चव्हाण 19. गणेश जुमळे 20. अमर तेलंग 21. रवि वाकोडे 22. शे. अलिम शे. सत्तार 23. प्रज्योत उमाळे 23. शुभम शमी, यांच्यासह 24 गोपनीय रक्तदाता, 25 गोपनीय रक्तदाता यांनी शासकीय रक्तपेढी मध्ये रक्तदान केले. या रक्तसेवेत एकनिष्ठाचे सुरजभैय्या यादव, चेतन कदम, कविताताई पाटील, नारायण सैरीसे, सागर दाभाडे, मधुकर सोळंके, कु. तेजस्विनी देशमुख, घारोड सरपंच वैभव पाटील शासकीय रकतपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी सौ. प्रणाली देशमुख व टेक्निशियन अली सर, सौ. पाटील कर्मचारी राम अंभोरे, भारती काळे यांचे सहकार्य लाभले अशी माहिती गोपाल सायखेडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. "एक रक्तदाता = तीन जीवनदाता" हा संदेश देत अधिकाधिक युवकांनी रक्तदान चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटने तर्फे सुरजभैय्या यादव यांच्या वतीने करण्यात आले.
---
0 Comments