Advertisement

खामगाव अर्बन बँकेत टी.डी.एस. कार्यशाळा संपन्न; आयकर अधिकाऱ्यांकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन*खामगाव / संतोष आटोळे (विशेष जिल्हा प्रतिनिधी)

खामगाव अर्बन बँकेत टी.डी.एस. कार्यशाळा संपन्न; आयकर अधिकाऱ्यांकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन*
खामगाव / संतोष आटोळे (विशेष जिल्हा प्रतिनिधी)
                  खामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य कार्यालयात टी.डी.एस. (Tax Deducted at Source) विषयावरील महत्त्वपूर्ण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत नागपूर विभागातील आयकर अधिकारी श्रवणकुमार व धर्मेंद्रकुमार यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना टी.डी.एस. नियम, डेटा व्यवस्थापन आणि करसंबंधी विविध तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
दि. १५ जुलै २०२६ रोजी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बँकेच्या व्यवहारांची तपासणी व पाहणी केली होती. त्यानंतर दि. १६ जुलै रोजी मुख्य कार्यालयातील माधव सभागृहात आयोजित कार्यशाळेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच टी.डी.एस. कार्यप्रणालीतील आवश्यक सुधारणा, भविष्यात घ्यावयाची दक्षता आणि अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी आयकर अधिकारी श्रवणकुमार यांनी डेटा सिक्युरिटी, डेटा क्लिनिंग, मल्टिपल यूसीआयडी टाळणे, पॅन क्रमांकाची अचूक नोंद, खाते अद्ययावत करताना घ्यावयाची काळजी तसेच SFT व TDS रिटर्न तांत्रिकदृष्ट्या तपासूनच दाखल करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

कार्यशाळेप्रसंगी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजयजी पुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वरराव जाधव तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयकर अधिकारी व त्यांच्या पथकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यशाळेनंतर बँकेच्या सॉफ्टवेअरमधील आवश्यक सुधारणा व डेटा अद्ययावत करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली. तसेच आयकर अधिकारी व त्यांच्या पथकाचे आभारही व्यक्त करण्यात आले.
छायाचित्र: खामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित टी.डी.एस. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना आयकर अधिकारी व उपस्थित बँकेचे पदाधिकारी आणि कर्मचारी.

Post a Comment

0 Comments