Advertisement

जि.प.मराठी मुलींची शाळा पहूर कसबे येथे अंकूर सिड्स प्रा. लिमीटेड नागपूर यांच्या गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन वह्या वाटप करण्यात आल्या.

 आज जि.प.मराठी मुलींची शाळा पहूर कसबे येथे अंकूर सिड्स प्रा. लिमीटेड नागपूर यांच्या गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन वह्या वाटप करण्यात आल्या. 



सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण


सोयगाव तालुक्यातील जवळच असलेले

जामनेर तालुक्यातील पहूर येथील कन्या शाळेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कन्या शाळेतील  शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. बाबूराव रामचंद्र पवार यांनी स्विकारले अध्यक्षांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाला  श्री. राजू रामदास जाधव (गामपंचायत उपसरपंच),  श्री. युवराज रामदास जाधव  ( अंबिका कृषी केंद्र संचालक), श्री. रविंद्र ओंकार बनकर ( कृषी केंद्र संचालक), श्री प्रकाश गरूड (गरूड कृषी केंद्र संचालक), श्री. राहूल पाटील (अंकुर सिड्स तालुका प्रतिनिधी), श्री.बबलू तडवी (अंकुर सिड्स प्रतिनिधी), श्री. लक्ष्मण नामदेव गोरे ( ग्रामपंचायत सदस्य),श्री.वासूदेव पंडित घोंगडे ( ग्रामपंचायत सदस्य),श्री.मधूकर बनकर पहूर,श्री.चेतन रोकडे पहूर श्री. संजय दादा पाटील (वकिल साहेब), उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. उमाकांत तळेले सर यांनी केले सूत्रसंचालन श्रीमती किर्ती बाबूराव घोंगडे केले. विद्यार्थीना मान्यवरांचा हस्ते वह्या वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments