Advertisement

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन सभेच्या माध्यमातून नक्कीच समाजामध्ये जागृतीकरण होईल

 *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन सभेच्या माध्यमातून नक्कीच समाजामध्ये जागृतीकरण होईल


*


 *.......ॲड सुभाष राऊत*


(बीड प्रतिनिधी)


आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन अभिवादन सभा बीड या सभेचे आयोजक माननीय प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य हे अनेक दिवसापासून करत आहेत आजच्या या अभिवादन सभेचा बाविसावा रविवार असून आजच्या अभिवादन सभेचे मानकरी ॲड सुभाष राऊत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद प्रदेश उपाध्यक्ष व सुधाकर वैद्य जिल्हा परिषद बीड यांच्या शुभहस्ते आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर ,राजे यशवंतराव होळकर ,राजे मल्हारराव होळकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

   धनगर समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे यासाठी अनेक दिवसापासून प्रकाश भैय्या सोनसळे यांनी पुढे येऊन हा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमात समाज बांधवांनी सहभागी झाले पाहिजे‌ व आपल्या दैवतासाठी एकत्र आले पाहिजे आज मला खरोखर आनंद होतो की दर रविवारी या ठिकाणी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर ,राजे यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर ,या महापुरुषांचे साप्ताहिक अभिवादन होते नक्कीच हा समाज जागृत होऊन पुढे जाईल असे या कार्यक्रमास संबोधित करताना ॲड.सुभाष राऊत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांनी सांगितले.

यावेळी सोपान काका गावडे ,अंकुश गवळी पत्रकार, गाडेकर ताई,नितीन राऊत, पवन गावडे,अमर वाघमोडे, सूर्यकांत कोकाटे ,भाऊसाहेब काळे, करण भोंडवे, उघडे सर, बाळासाहेब गावडे, पांढरे सर, लिंबाजी महानवर, वैद्य भैया, आरगडे भैय्या, राऊत भैय्या,आदी समाज बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments