Advertisement

पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत पाच वर्षांनी वाढकरण्याकरिता दिले निवेदन* *बुलढाणा जिल्हा गाव पोलीस संघटनेची मागणी* खामगाव/(संतोष आटोळे )

*पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत पाच वर्षांनी वाढकरण्याकरिता दिले निवेदन* 
*बुलढाणा जिल्हा गाव पोलीस संघटनेची मागणी* 
खामगाव/(संतोष आटोळे )          अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सेवानिवृत्ती च्या वयाच्या धर्तीवर पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत वाढ करावी अशा मागणी वजा विनंती चे निवेदन बुलढाणा जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघटनेतर्फे १६ मार्च रोजी बुलढाणा येथील अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड यांना देण्यात आले. सदर निवेदन गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भामद्रे, कार्याध्यक्ष गणेश गायकवाड, सचिव अभिमान शेळके, व मोताळा तालुकाध्यक्ष देविदास जाधव यांनी दिले. यावेळी उपरोक्त पदाधिकाऱ्यांनी ए एस पी गायकवाड यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी आपल्या मागणीच्या संदर्भातील सकारात्मक अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल अशी ग्वाही दिली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष भामद्रे यांनी दिली. 

          निवेदनात म्हटले आहे की ग्राम पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच महसूल व वन विभागासह इतर प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजात पोलीस पाटील सहकार्य करीत आहे. शासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून पोलीस पाटील हे महत्त्वाची भूमिका बजवीत आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेल्या पोलीस पाटलांनी प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्ष राहून सेवा केली आहे व करत आहे, सद्यस्थितीत पोलीस पाटील यांच्या सेवानिवृत्तीचे वयोमर्यादा सरकारने 60 वर्षे निश्चित केली आहे. मानधन तत्वावर व एक छत्री समितीमध्ये समाविष्ट असलेल्या घटका पैकी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा सरकारने 60 वर्षावरून 65 वर्षापर्यंत वाढविली आहे. त्या धरतीवर पोलीस पाटील मानधन तत्वावर काम करीत आहे. त्यामुळे सेविका व मदतनीस यांच्या धरतीवर पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्ष करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे .गाव कामगार पोलीस संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 65 करण्यात यावे या मागणीचे निवेदन सरकारला वेळोवेळी देण्यात आले आहे. या मागणीची दखल घेत 31 ऑगस्ट 24 रोजी नागपूर येथे पोलीस पाटील संघटनेतर्फे आभार मेळाव्यात तात्कालीन गृहमंत्री तथा सध्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस पाटील यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्ष करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच 9 मार्च 2026 रोजी गृहराज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व अधिकाऱ्याच्या उपस्थितीत पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात बैठक पार पडली. त्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांना 10 मार्च 26 च्या पत्रानुसार पोलीस पाटलांच्या वयोमर्यादे वाढी संदर्भात अहवाल मागितला असल्याचेही भामद्रे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments