Advertisement

इंग्रजी वाचन कौशल्याला चालना देणाऱ्या पुस्तकाचे भव्य प्रकाशन* खामगाव (संतोष आटोळे )

*इंग्रजी वाचन कौशल्याला चालना देणाऱ्या पुस्तकाचे भव्य प्रकाशन* 
खामगाव (संतोष आटोळे )  दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद बुलढाणा येथे एका प्रेरणादायी व शैक्षणिक वातावरणात पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद कदमापूर मराठी प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक राजेश कोगदे यांच्या ‘इंग्रजी वाचनाची दहा तंत्रे’ या उपयुक्त पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात ,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील  , प्रकल्प अधिकारी , राठोड मॅडम, अतुल देशपांडे सर, केंद्रप्रमुख रवींद्र चेके , मुख्याध्यापक श्रीधर पल्हाडे सर ,ओपन लिंक फाऊंडेशन चे समन्वयक शे.नाजीर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

 यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुस्तकाचे कौतुक करत, इंग्रजी वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी हे पुस्तक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमास  जिल्ह्यातील अनेक उपक्रमशील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात साहेब व शिक्षणाधिकारी विकास पाटील साहेब, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या प्रेरणेतून नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी बळ मिळत आहे.या पुस्तकातील तंत्रानुसार विद्यार्थी शिकला तर आत्मविश्वासपूर्ण इंग्रजी वाचन  शिकेलच हे मात्र निश्चित.
*राजेश कोगदे* 
 *शिक्षक, कदमापूर*

Post a Comment

0 Comments