*संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समिती प्रशासन सज्ज*
*उपाय योजनेचा आराखडा तयार*
यंदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच वाढत चाललेल्या उन्हाच्या दाहकतेमुळे विहिरी व प्रकल्पांमधील पाण्याचा साठा झपाट्याने खालावत आहे त्यामुळे आगामी काळात ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये यासाठी नामदार ऍड. आकाश दादा फुंडकर, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशा नुसार खामगाव पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने सरपंच /प्रशासक व ग्राम पंचायत अधिकारी यांची पाणी टंचाई वर मात करण्यासाठी गट विकास अधिकारी चंदन सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा सभा दिनांक १२/३/२६ रोजी घेण्यात आली
टंचाईवर मात करण्यासाठी करावयाच्या उपायोजना याचा कृती आराखडा तयार केला आहे जर एखाद्या गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली तर त्यावर मात करण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाला या आराखड्यामुळे ती सोडविण्यासाठी तारेवरची कसरत करण्याची वेळ येणार नाही आणि टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना पाण्याच्या समस्येला तोंड देण्याची वेळ येणार नाही
खामगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या 132 गावात आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास त्यावर मात करण्यासाठी करावयाच्या उपायोजनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे यामध्ये एक गावात बुडकी घेणे एका गावात विहिरीचे खोलीकरण 74 गावात विहीर अधिग्रहण तीन गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा व 17 गावातील प्रगती पथावरील नळ योजनेचे काम पूर्ण करण्याबरोबर विविध योजनांचा समावेश आहे सद्यस्थितीत जयपुर लांडे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली असल्याने या गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी एका विहिरीचे अधिग्रहण मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच करण्यात आले आहे खामगाव ग्रामीण व कोकता मागता या दोन गावातील विहीर अधिग्रहणाच्या पडताळणीचे प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे पाठविण्यात आले आहे या प्रस्तावाला पाणीपुरवठा विभागाकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर तो प्रस्ताव मंजुरीसाठी येथील तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात येईल आणि या दोन गावातील विहिरी आधीग्रहणाला तहसील कार्यालयाकडून मंजुरात मिळाल्यानंतर त्या त्या गावातील विहिरीचे अधिग्रहण करण्यात येईल आणि त्यानंतर त्या गावांना अधिग्रहण केलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्याची कार्यवाही करण्यात येईल
सध्या जयपूर लांडे वगळता उर्वरित गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई नाही ज्या गावातील पाणीटंचाईचे प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त होतील ते प्रस्ताव संबंधितांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येतील आणि मंजुरी मिळाल्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येईल प्रस्ताव ग्राम पंचायत ने संभाव्य पाणी टंचाई निर्माण होण्यापूर्वी किमान आठ दिवसा पुरी सादर करावे असे, आवाहन चंदन सिंग राजपूत
गटविकास अधिकारी पंचायत समिती खामगाव यांनी केले आहे.
0 Comments